Tiger attack wounds । जखमी T – १ ० ० अखेर वाघ जेरबंद

Tiger attack wounds

Tiger attack wounds : ४ जानेवारीला ब्रह्मपुरी वनविभागातील नागभीड वनपरिक्षेत्रातील मींडाळा मध्ये २ नर वाघांमध्ये झुंज झाली, या झुंजीत T- १ ० ० वाघाच्या समोरील पायाला गंभीर जखम झाली तर दुसऱ्या वाघाला मानेवर, पाठीवर व पायावर जखमा झाल्या. वाघ झुंजीत जखमी झाल्याने दोन्ही वाघाला उपचाराची आवश्यकता असल्याने दोघांनाही जेरबंद करण्याची कारवाई वनविभागातर्फे सुरु होती.

चंद्रपुरातील मंदिर असुरक्षित, तिरुपती बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा

वनविभागाच्या मोहिमेदरम्यान १ ० जानेवारीला T – १ ० ० नर वाघाने कोसंबी गवळी नियतक्षेत्रातील मौजा पारडी येथील रहिवासी गुरुदेव पुरुषोत्तम सारवे यांच्यावर हल्ला करून जखमी केले. त्यांनतर वाघाचे वास्तव्य शेतशिवारात कायम होते सोबतच वाघ जखमी असल्याने तो शिकार करू शकत नव्हता. सदर बाब वनविभागाच्या लक्षात आली. १ २ जानेवारीला कोसंबी गवळी नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक १ १ ० मध्ये वनविभागाने बचाव मोहीम राबवित सकाळी सदर जखमी वाघाला डार्ट केले. बेशुद्ध झाल्यावर जखमी वाघाला पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केले. (Tiger injured)

जेरबंद करण्यात आलेल्या T-१ ० ० वाघाचे वय अंदाजे १ ० वर्षे असून त्याला पुढील वैद्यकीय उपचारासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे.

वाघाच्या हि बचाव मोहीम वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण कन्नमवार, वैद्यकीय अधिकारी डॉ रविकांत खोब्रागडे, शुटर अजय मराठे, राकेश अहुजा यांनी यशस्वीपणे राबवली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!