Tiger Dead | चंद्रपूर जिल्ह्यात एका महिन्यात ३ वाघांचा मृत्यू

Tiger Dead

Tiger Dead : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात बल्लारपूर – गोंदिया रेल्वे मार्गावर १९ जानेवारीला रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून आतापर्यंत जानेवारी महिन्यात १९ दिवसात ३ वाघाचा मृत्यू झाला आहे.

दक्षिण पुर्व मध्य रेल्वे , बिलासपुर झोन अंतर्गत गोंदिया- नागभीड- चांदाफोर्ट – बल्लारशाह हा रेल्वे मार्ग जास्तीत जास्त जंगलव्यात भागातून आहे. त्यातही नागभीड- चांदाफोर्ट रेल्वे मार्ग घनदाट जंगलातून असुन ताडोबा – अंधेरी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प व घोडाझरी अभयारण्य लागूनच आहे. या रेल्वे मार्गांवर अनेक ठिकाणी वाघ , हरिण , रानगवे , अस्वल यासारखे वन्यप्राणी अपघातात मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असून सुद्धा आजपर्यंत वनविभागाने यावर ठोस उपाययोजना केली नाही.

चंद्रपूरच्या खासदाराचे दमदार काम

सिंदेवाही – आलेवाही रेल्वे स्थानकाच्या दरम्यान आज सकाळी बल्लारपूरकडून गोंदियाकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनने या वाघाला धडक दिली. मृत वाघ अंदाजे एक वर्षाचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घनदाट जंगलातून जाणा-या या रेल्वेमार्गावर वन्यजीव मृत्यूच्या घटना वारंवार होत असून त्या टाळण्यासाठी रेल्वे आणि वनविभाग यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त होत आहे. railway line

आतापर्यंत ३ वाघांचा मृत्यू

२ जानेवारीला सिंदेवाही वनपरिक्षेत्रात मौजा लाडबोरी येथील शेतशिवारात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह मिळाला होता, वाघ वयोवृद्ध असल्याने त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने नोंदविला होता. ९ जानेवारीला मूल तालुक्यातील भांदुरणा या गावी ५ महिन्याच्या वाघाच्या बछड्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. तर १९ जानेवारीला सिंदेवाही – आलेवाही रेल्वे स्थानक दरम्यान रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!