tiger poaching in chandrapur । वाघांच्या शिकार प्रकरणात मोठी कारवाई, शिलॉंगमधूनही आरोपीला अटक

tiger poaching in chandrapur

tiger poaching in chandrapur : राज्यात सर्वात जास्त वाघ असलेल्या चंद्रपुरात वाघाची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित पारधी आदिवासी याला चंद्रपूर जिल्ह्यातील राजुऱ्यातून वनविभागाने २५ जानेवारीला अटक केल्यावर चांगलीच खळबळ उडाली आहे. अजित सह इंजेक्शन पारधी आदिवासी, रीमाबाई अजित पारधी आदिवासी, रविना आयुष आदिवासी, सेवा यश आदिवासी व राजकुमारी अजित पारधी यांना अटक करण्यात आली आहे. ३१ जानेवारी पर्यंत ६ आरोपीना न्यायालयाने वणकोठडी सुनावली होती. (Wildlife Crime)

यादरम्यान चौकशी मध्ये अजित ने एका वाघाची शिकार केली असल्याची कबुली वनविभागासमोर केली. वनाधिकारी यांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार सापळे व वाघाचे अवयव खड्ड्यात लपवून ठेवलेल्या ठिकाणाहून जप्त करीत सदर अवयव फॉरेन्सिक तपासणी करीता पाठविण्यात आले होते, फॉरेन्सिक अहवालात सदर अवयव वाघाचे असल्याचे स्पष्ट झाले. 

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू शनिवारी चंद्रपुरात

विशेष म्हणजे या प्रकरणाशी संबंधित संशयित आरोपी ५० वर्षीय लालनेइसुंग याला शिलॉंग येथून ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे उपसंचालक व तीन सदस्यीय Sit प्रमुख आनंद रेड्डी येल्लू यांनी अटक केली आहे, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो च्या सहयोगाने आरोपी लालनेइसुंग ला चंद्रपुरात आणण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीनुसार लालनेइसुंग याचे चंद्रपुरात अटक करण्यात आलेल्या अजित पारधी सोबत व इतर आरोपीशी संबंध असल्याची माहिती वनविभागाच्या हाती लागली आहे. आरोपी लालनेइसुंग ला ४  फेब्रुवारी पर्यंत वणकोठडी सुनावली आहे. (wildlife crime in chandrapur)

आरोपींची ३१ जानेवारी रोजी वणकोठडी संपल्याने त्यांना JMFC न्यायालय राजुरा मध्ये हजर करण्यात आले असता अजित पारधी, इंजेक्शन पारधी, रीमा, रविना, सेवा याना ४  फेब्रुवारी पर्यंत वणकोठडी सुनावण्यात आली तर राजकुमारी पारधी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. Tiger Poaching  

कोण आहे अजित पारधी?

अटक करण्यात आलेल्या आरोपींचे इतर टोळी सोबत संबंध आहे काय? त्यांच्या संपर्कात अजून कोण आहे याबाबत ११ सदस्यीय विशेष तपास पथकातील DCF सेंट्रल चांदा स्वेता बोड्डू, उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग, dfo सचिन शिंदे, बापू येळे, आदेश शेंडगे, वेणुगोपाल, महेश गायकवाड, सुरेश येलकवाड, अरुण गोंड, आकाश सारडा, मुकेश जवळकर, शहाबाज शेख करीत आहे. (Baheliya gang tiger hunting)

अजित पारधी हा राजुरा तालुक्यातील चुनाळा येथे कुटुंबासहित मागील ३ महिन्यापासून राहत होता, विशेष म्हणजे कुटुंबातील महिला वाघाच्या शिकारीसाठी मदत करीत होते. वनविभागाने अजित ला अटक केल्यावर त्याच्या फोन ची तपासणी केली असता त्यामधून ७० लाखांचा व्यवहार झाला असल्याची माहिती मिळाली.  अजित हा मूळचा मध्यप्रदेश राज्यातील कटनी जिल्ह्यातील बिरहूली या भागात राहतो वाघाच्या शिकारीसाठी प्रसिद्ध असलेल्या बहेलिया टोळीचा तो म्होरक्या आहे. विशेष बाब म्हणजे मागील ३ महिन्यापासून तो चंद्रपुरात होता याची साधी चाहूल वनविभागाला का लागली नाही? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित झाले आहे. अभयारण्यातील वाघ हे सुरक्षित असतात मात्र ज्या ठिकाणी वनविभागाचे दुर्लक्ष असते त्याच ठिकाणी शिकारी आपले जाळे विणत होता. 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!