tirupati balaji Temple in chandrapur
tirupati balaji Temple in chandrapur : मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरात चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.
घरफोडी नंतर अज्ञात चोर दुकानाला टार्गेट करू लागले आहे, चोर आता इतक्यावर थांबले नसून त्यांनी थेट मंदिराला टार्गेट केल्याचा प्रकार उघडकीस आला असून शहरातील दाताला मार्गावरील तिरुपती बालाजी मंदिरात अज्ञात चोरांनी सशस्त्र दरोडा टाकला.
सदर घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला, विशेष म्हणजे अज्ञात चोरांनी बंदुकीचा धाक दाखवीत पुजाऱ्याचे दोन्ही हात बांधत मंदिराच्या गाभाऱ्यातील दानपेटी फोडत त्यामधील लाखो रुपये घेऊन पसार झाले.
तिरुपती बालाजी मंदिर परिसरातील इतर मंदिर फोडण्याचा प्रयत्न यावेळी झाला मात्र कुलूप न तुटल्याने चोरांनी तिथून पळ काढला. (Chandrapur crime)
रात्री 2 वाजता सुरक्षा रक्षकाला सदर बाब निदर्शनास आल्यावर घटनेची माहिती इतरांना देत बंधक असलेल्या पुजाऱ्याची सुटका करीत पोलिसांना चोरी प्रकरणाची माहिती दिली.
अंमलीपदार्थ तस्करी मोडून काढा – आमदार जोरगेवार
दाताला मार्गावर स्थित तिरुपती बालाजी मंदिर संचालित करणाऱ्या ट्रस्ट चे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलीया आहे, नुकताच या मंदिरात ब्रम्होत्सव सोहळा संपन्न झाला होता.
आधी रेकी मग चोरी
शनिवारी रात्री एक इसम या मंदिरात आला, त्याने मंदिर परिसराची पूर्ण पाहणी करीत रेकी केली होती, त्यानंतर मध्यरात्री 7 ते 8 इसम सशस्त्र मंदिरात दाखल झाले, मंदिरात लागून असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कापड टाकून त्यांनी दरोडा टाकला.
रामनगर पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहे.