Wcl Coal Mine
Wcl Coal Mine : खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या विविध विभागात आकस्मित भेटी देणे सुरु केले असुन दि. 31 डिंसेबर 2024 रोजी वेकोली क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या खाणीत भेटी दिल्या.
खा. प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या वेकोली खाणीना भेटी दिल्या या वेळी वणी क्षेत्रा अंतर्गत निलजई खाणीत व बल्लारपुर क्षेत्रातील गोवरी-पवनी येथिल श्री. बुध्दा कंपनीत तसेच पवनी येथिल हर्षा कंपनीत आकस्मिक भेट दिली.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या मृत्यूने खळबळ
यावेळी तेथिल कार्यरत कर्मचाऱ्याची सुरक्षा, कल्याण सुविधा, एच.पि.सी. वेतन या संदर्भाने वेकोली तसेच कंत्राटदारांशी चर्चा करण्यात आली. तसेच वेकोली खाणीमुळे प्रभावित होणाऱ्या क्षेत्रातील बेरोजगारांना रोजगार देण्या संदर्भाने देखिल चर्चा करण्यात आली.
यावेळी खासदार धानोरकर यांनी अधिकारी व कंत्राटदारांना कर्मचाऱ्याच्या सुरक्षे सबंधी सुचना दिल्या व खाणीतील कर्मचाऱ्याशी चर्चा करुन त्यांना येणाऱ्या समस्या जाणुन घेतल्या. खाणीन मुळे प्रभावित होणाऱ्या क्षेत्रातील नुकसानीचा आढावा देखील खा. धानोरकर (pratibha dhanorkar) यांनी घेतला.
यावेळी खासदार धानोरकर यांच्या सोबत वेकोलीतील अधिकारी तसेच कंत्राटदार व कार्यकर्ते खाण प्रभावित गावातील असंख्य गावकरी उपस्थित होते.