Yuvasena college kaksh | चंद्रपूर युवासेना कॉलेज कक्ष पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

Yuvasena college kaksh

Yuvasena college kaksh : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे यांच्या आशिर्वादाने, शिवसेना -युवासेना सचिव,आ. वरून सरदेसाई यांच्या आदेशानुसार, युवासेना कार्यकरणी सदस्य हर्षलजी काकडे, युवासेना पूर्व विदर्भ सचिव,सिनेट सदस्य निलेशजी बेलखेडे, युवासेना सहसचिव रोहिणी पाटील,विस्तारक संदीप रियाल पटेल, युवासेना जिल्हा युवा अधिकारी विक्रांत सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कॉलेज कक्ष पदाधिकारी नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. yuvasena 

सुधीर मुनगंटीवार नाराज आहे का?

युवासेना कॉलेज कार्यकारिणी, जिल्हा चंद्रपूर.
इंजि. चेतन बोबडे यांच्याकडे घुग्घूस शहर प्रमुख सोबतच अतिरिक्त कॉलेज कक्ष लोकसभा अध्यक्ष (चंद्रपूर-वणी-आर्णी), इंजि. वतन मादर यांच्याकडे जिल्हा अध्यक्ष (चंद्रपूर-बल्लारशाह राजुरा),आदर्श लाडस्कर -जिल्हा सचिव, सार्थक शिर्के- विधानसभा अध्यक्ष (चंद्रपूर- विधानसभा), सोनू चावरे विधानसभा उपाध्यक्ष(चंद्रपूर- विधानसभा )यांची प्रमुख पदाधिकारी म्हणून नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.यासोबतच विविध महाविद्यालय येथे युवासेना कॉलेज कक्ष यूनिट यांची घोषणा करण्यात आलेली आहे. yuvasena 

सोबतच ब्रम्हपुरी येथील महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी ब्रह्मपुरी मध्ये युनिट अध्यक्ष म्हणून यश दंगत, उपाध्यक्ष पदी वैभव गायकवाड तर सचिव पदी प्रज्वल इंगळे यांची निवड करण्यात आलेली आहे.
मुंबई येथे झालेल्या युवासेना विभागीय सचिव यांच्या बैठकीमध्ये सिनेट सदस्य तथा पूर्व विदर्भ सचिव प्रा.निलेश बेलखेडे यांनी युवासेना सचिव आमदार वरुणजी सरदेसाई यांच्याशी चर्चा करून त्त्यांच्या मान्यतेने पूर्व विदर्भात जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयामध्ये विद्यार्थी, युवकांच्या यांच्या समस्या सोडविण्यासाठी,शिक्षण, आरोग्य व रोजगार यासंदर्भात त्रिसूत्री कार्यक्रम राबवून युवक- युवतीना सहकार्य करण्याकरिता तसेच पुढील विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये युवासेना कॉलेज कक्ष महत्वाची भूमिका पार पाडेल असा विश्वास व्यक्त करीत चंद्रपूर जिल्ह्यपासून कॉलेज कक्षाची सुरवात करण्यात आलेली आहे.यावेळी आमदार म्हणून निवडून आल्यामुळे शिवसेना युवासेना सचिव श्री.वरून सरदेसाई यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. yuvasena 

हाइटेक कॉलेज ऑफ़ फार्मेसो पाडोली चंद्रपूर येथे प्रणय मोहितकर, युनिट अध्यक्ष, प्रथमेश रायपुरे उपाध्यक्ष, तनिश्क़ गानापुरापू, सचिव पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सोमय्या पॉलिटेक्निक अँड डी फार्मा कॉलेज, चंद्रपूर येथे युनिट अध्यक्ष म्हणून विशाल यादव, उपाध्यक्ष म्हणून जिशान बंडली आणि सचिव म्हणून जाहिद शेख यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

राजिव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, चंद्रपूर.मध्ये युनिट अध्यक्ष म्हणून
गणेश बुक्कावर, उपाध्यक्ष म्हणून साहिल गेडाम, सचिव म्हणून
साहिल सूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

श्री. साई पॉलिटेकनिक अंँड आई टी आय मध्ये युनिट अध्यक्ष म्हणून हर्शल खनके उपाध्यक्ष रूपेश चौलागे, तर सचिव म्हणून ओम संगणवार नियुक्त करण्यात आले.

राजुरा येथील कोरपना आईटीआई कॉलेज, कोरपना येथेयुनिट अध्यक्ष म्हणून विशाल जुम्नके, उपाध्यक्ष प्रफुल केराम आणि सचिव पदी गौरव तालांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

यादवराव धोटे कॉलेज, राजूरा येथे युनिट अध्यक्ष म्हणून अनिकेत येरणी
उपाध्यक्ष म्हणून कुणाल ढोलेआणि चैतन्य रोहणकर
सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!