Animal abuse case chandrapur
Animal abuse case chandrapur : नशेच्या आहारी गेल्यावर मानवी जीवनात विकृती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे, अश्याच विकृती चे उदाहरण देणारी घटना चंद्रपूर शहरात 6 फेब्रुवारीला घडली.
61 वर्षीय इसमाने मोकाट कुत्रीला पकडत तिच्यावर अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला मात्र एका सुजाण युवकाला ही बाब कळताच त्याने तात्काळ विकृत घटना घडण्यापूर्वी त्या नराधमाला पोलिसांच्या स्वाधीन केले.
6 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास इंदिरा नगर येथे राहणारे 61 वर्षीय तीलक बाबुराव कुमरे हे एका मोकाट कुत्रीचे पाय पकडून अत्यंत क्रूर पणे रस्त्याच्या कडेला असलेल्या समाजभवनाकडे जात होता, तितक्यात इंदिरानगर वरून 30 वर्षीय युवक आपल्या आईला घेऊन दुचाकीने शहरात जात होते. Shocking news chandrapur
त्यावेळी सदर इसमाचे विकृत कृत्य त्या युवकाला दिसले काही अप्रिय घटनेची चाहूल त्या युवकाला लागली त्याने त्या इसमाचा पाठलाग केला असता कापडी आडोशात कुत्रीला झोपवित आरोपी कुमरे यांनी पॅन्ट काढत अतिप्रसंग करण्याच्या तयारी असताना त्या युवकाने अप्रिय घटना थांबविली.
हा प्रकार बघून परिसरातील नागरिक जमा झाले त्यांनी कुमरे ला चोप दिला, कुमरे हे नशेत होते, याबाबत प्यार फाउंडेशन व रामनगर पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी आरोपी 61 वर्षीय तीलक कुमरे ला अटक केली. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
61 वर्षीय इसमाच्या या अनैसर्गिक कृत्य बघून परिसरातील नागरिकही अवाक झाले आहे, आता जनावरे सुद्धा या नराधमापासून असुरक्षित असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.