Best sports festival 2025
Best sports festival 2025 : चंद्रपूर – २६ वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव २०२४ दि. १८ फेब्रुवारी ते दि. २२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत चंद्रपूर व बल्लारपूर परिक्षेत्रामध्ये भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांना या महोत्सवाचे यजमानपद बहाल करण्यात आले असून, विद्यापीठाने या स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन केले आहे. हा राज्यस्तरीय महोत्सव गोंडवाना विद्यापीठासाठी तसेच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अभिमानास्पद क्षण आहे. Top university sports events
प्रेस परिषदेतील माहिती
दि. १५ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथील तिरुपती क्राऊन येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महोत्सवाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
उद्घाटन समारंभ
महोत्सवाचा उद्घाटन समारंभ दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता तालुका क्रीडा संकुल, विसापूर, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री साहेब कृषी मंत्र्यांना आवरा – खासदार प्रतिभा धानोरकर
- उद्घाटन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या हस्ते होणार आहे.
- अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन असतील.
- प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास व पालकमंत्री डॉ. अशोक रामाजी ऊईके, क्रीडा व युवक तसेच अल्पसंख्याक विकास मंत्री ना. दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती असेल.
- तसेच विद्यापीठ परिक्षेत्रातील खासदार, आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. (Biggest inter-university sports)
क्रीडा स्पर्धांचे स्वरूप व वेळापत्रक
महोत्सवात मुले व मुलींसाठी कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, ॲथलेटिक्स आणि चेस अशा एकूण ८ प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत.
- स्पर्धांचे वेळापत्रक:
- सकाळी: ७.०० ते दुपारी १२.००
- संध्याकाळी: ४.०० ते रात्री ९.००
स्पर्धा स्थळे:
- कबड्डी, खो-खो: आरएसएसएस, विसापूर (४ मैदाने)
- व्हॉलीबॉल: आरसीईआरटी, चंद्रपूर (४ मैदाने)
- बास्केटबॉल: सैनिक स्कूल, विसापूर (४ मैदाने)
- बॅडमिंटन: जिल्हा क्रीडा स्टेडियम, चंद्रपूर (बॅडमिंटन हॉल)
- टेबल टेनिस: तालुका क्रीडा संकुल, विसापूर (बॅडमिंटन हॉल)
- ॲथलेटिक्स: तालुका क्रीडा संकुल, विसापूर
- चेस (बुद्धिबळ): आरसीईआरटी, चंद्रपूर (इन हॉल)
स्पर्धक व सहभागी विद्यापीठे
या महोत्सवासाठी २३ विद्यापीठांमधून ३,७२३ खेळाडू आणि संघव्यवस्थापकांनी नोंदणी केली आहे. तसेच विद्यापीठ पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि स्वयंसेवकांसह एकूण ४,५०० जण महोत्सवात सहभागी होणार आहेत. (State-level sports championship)
निवास आणि भोजन व्यवस्था
महिला खेळाडूंसाठी निवास व्यवस्था:
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर (महिला स्टाफ क्वार्टर)
- राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय (मुलींचे वसतिगृह)
- क्रीडा संकुल, बल्लारपूर
पुरुष खेळाडूंसाठी निवास व्यवस्था:
- विकास केंद्र, चंद्रपूर
- क्रीडा संकुल, विसापूर
- आरएसएसएम कॉलेज, बल्लारपूर
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर (स्टाफ क्वार्टर)
- संत तुकाराम सभागृह, बल्लारपूर
भोजन व्यवस्था:
सर्व खेळाडू व सहभागींसाठी मैदानांवरच भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
- आरएसएसएस, विसापूर – १,१८८ जणांसाठी
- तालुका क्रीडा संकुल, विसापूर – ९४२ जणांसाठी
- आरसीईआरटी, चंद्रपूर – ८९१ जणांसाठी
- सैनिक स्कूल, बल्लारपूर – ६०९ जणांसाठी
- जिल्हा क्रीडा स्टेडियम, चंद्रपूर – ३७० जणांसाठी
परिवहन व वैद्यकीय सेवा
- परिवहन सेवा:
- खेळाडूंना निवासस्थानांहून मैदानांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या २५ बसेस उपलब्ध.
- आगमन व निर्गमनासाठी विशेष ७ बसेस.
- वैद्यकीय सेवा:
- खेळाडूंसाठी २४ तास उपलब्ध असलेल्या ८ रुग्णवाहिका.
- जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर यांच्याद्वारे प्राथमिक उपचार आणि औषधांचा पुरवठा.
समारोप सोहळा
महोत्सवाचा समारोप दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता, तालुका क्रीडा संकुल, विसापूर, बल्लारपूर येथे होणार आहे. (Competitive college tournaments)
- प्रमुख अतिथी: मा. हंसराज अहिर, अध्यक्ष, इतर मागासवर्गीय आयोग, भारत सरकार
- अध्यक्षस्थानी: मा. डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरु, गोंडवाना विद्यापीठ
- प्रमुख उपस्थिती: मा. डॉ. श्रीराम कावळे, प्र-कुलगुरु, गोंडवाना विद्यापीठ
गोंडवाना विद्यापीठाचा पूर्वानुभव
गोंडवाना विद्यापीठाने यापूर्वीही यशस्वीपणे राज्यस्तरीय महोत्सव आयोजित केले आहेत:
- १३ वा आंतर विद्यापीठ संशोधन उत्सव “आविष्कार” (२०१८-१९)
- १७ वा आंतर विद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव “इंद्रधनुष्य” (२०१९)
- राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर “आव्हान” (२०२३)