Bibi village murder case | भरदिवसा चंद्रपुरात युवकाची हत्या

Bibi village murder case

Bibi village murder case : चंद्रपूर जिल्हा गुन्हेगारीत रक्तरंजित झाला असून भरदिवसा एका तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

भरदिवसा तरुणाचा खून झाल्याची घटना कोरपना तालुक्यातील बिबी गावात आज घडली, शिवराज उर्फ शिवा पांडुरंग जाधव वय 21 वर्ष खून झालेल्या युवकाचे नाव असून गावातील कब्रस्तान रोडवर शिवाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला स्थानिक शेतकऱ्यांना दिसला.

चंद्रपूर जिल्ह्यात शिकाऱ्याची कॉलिंग

त्यांनी याबाबत तात्काळ पोलीसाना माहिती दिली त्यानंतर मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी गर्दी केली, मात्र तरुणाचा खून करणाऱ्या आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचं बोललं जात असून आरोपीला पोलिसांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

मृत युवकांचा लहान भावा सोबत काही दिवसापूर्वी वाद झाल्याची माहिती आहे. त्याचा राग मनात धरून हा खून केला असा बोलल जात आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्यांनी अनेक गुन्हे केले असल्याची माहिती आहे.

अनेक वर्षापासून वार्डामध्ये दहशत माजविण्याच काम आरोपीकडून होत असल्याची माहिती आहे. पुढील तपास पी आय कदम यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पिंपळकर, पोलीस शिपाई तिरुपती माने, संदीप थेरे, संदीप अडकिने, इस्वर देवकते करीत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!