Bird flu Chandrapur latest news
Bird flu Chandrapur latest news : 25 जानेवारी रोजी ब्रह्मपूरी तालु्क्यातील मांगली गावतील पोल्ट्री फॉर्मवर काही कोंबड्या दगावल्या. ही बाब प्रशासनाला समजातच पशूपालन विभागाने धाव घेतली. त्यांनी नमुने घेतले. नमुने पुणे आणि भोपाळ येथे पाठवण्यात आले. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार या कोंबड्यांना एव्हियन इन्फ्लूएंझा एच5एन1 झाल्याचे समोर आले आहे.
कृषी सहायकाने शेतकऱ्याला मागितली लाच, चंद्रपुरात कारवाई
अहवालानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी मांगली गाव आणि त्याच्या आजूबाजूचा 10 किलोमीटर परिसर अलर्ट झोन जाहीर केला आहे. संक्रमण पसरू नये यासाठी उपाय योजना करण्याचे काम सुरू करण्यात आले. (Bird Flu in Maharashtra)
मांगली, गेवलाचक आणि जुनोनाटोली या गावातील पोल्ट्री फार्मवर बर्ड रॅपिड रिस्पान्स टीम पोहचली आहे. संसर्ग झालेल्या कोंबड्यांना आता नष्ट करण्यात येणार आहे. त्यांना योग्यरितीने नष्ट करण्यात येईल. तर अंडे आणि पिल्लांना पण नष्ट करण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात शिकाऱ्याची कॉलिंग
संसर्ग रोखण्यासाठी या भागात दळणवळण थांबवण्यात आले आहे. या परिसरात चिकन विक्री, अंडे विक्रीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. इतर पक्ष्यांना, पशूंना कोणताही धोका होऊ नये यासाठी कोंबड्या नष्ट करण्यात येत आहेत. या परिसरात सोडियम हायपोल्कोराईट वा पोटेशियम परमॅगनेटने स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या परिसरातील सर्व चिकन, मटन दुकाने सध्या बंद करण्यात आली आहे. (H5N1 outbreak in Chandrapur)
बर्ड फ्लू च्या पार्श्वभूमीवर मांसाहार करू शकतो काय?
सदर 3 गावातील 1 किलोमीटर परिसरातील सर्व पक्षीजन्य जनावरांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे, सोबतच 10 किलोमीटर च्या भागात अलर्ट लावण्यात आला आहे, बर्ड फ्लू ने मानवी जीवनावर परिणाम होतो काय यावर पशुसंवर्धन विभाग चंद्रपूरचे उपायुक्त खाडे यांनी माहिती दिली की बर्ड फ्लू हा व्हायरस मानवी शरीरात त्याचा शिरकाव झाला अशी आजपर्यंत कोणतीही घटना आपल्या देशात घडलेली नाही. अंडे व मांस हे शिजवून खाल्लेलं बरं या व्हायरस बाबत कुणीही अफवा पसरवू नये असे आवाहन खाडे यांनी यावेळी केले.