Cement industry labor laws । कामगारांच्या न्यायहक्कांसाठी विजय वडेट्टीवार आक्रमक

Cement industry labor laws

सिमेंट कंपन्यांना दिला सडेतोड इशारा

Cement industry labor laws : कामगार धाम गाळतो तेव्हाच कारखान्यातून उत्पादन तयार होते. कामगाराच्या समर्पित भावनेशी कुठलाही खेळ न करता त्यांना मिळणारे भत्ते, सुविधा व त्यांच्या न्यायिक हक्काबाबत  कुठलीही तडजोड नको. अशा सूचना राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार आ. विजय वडेट्टीवार यांनी अंबुजा सिमेंट कंपनी येथे आयोजित व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांना दिल्या. 

तंबाखू नियंत्रणासाठी चंद्रपूर जिल्ह्यात भरारी पथकाची स्थापना

औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात सिमेंट उत्पादक कारखान्यासह अन्यही मोठे उद्योग सुरू आहेत. या औद्योगिक क्षेत्रात कामगारांचा न्याय हक्क त्यांना मिळावा यासाठी युवक काँग्रेस सरचिटणीस तथा विजय क्रांती कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार सदैव प्रयत्नशील असतात.

जिल्ह्यातील अनेक औद्योगिक कंपन्यांमध्ये विजय क्रांती संघटनेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली असून कामगारांचे अनेक प्रश्न सोडविले आहे. अशातच नुकत्याच चंद्रपूर जिल्ह्यातील अंबुजा सिमेंट कंपनी (Ambuja Cement worker issues) व एसीसी सिमेंट कंपनी यातील कामगारांनी स्वच्छ निवृत्ती किमान वेतन भत्ते (Minimum wage for cement workers) व इतर काही सुविधांबाबतच्या समस्या विजय क्रांती कामगार संघटने पुढे मांडल्या.

कामगारांचा छळ करून नका

या संदर्भात राज्याची माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावून समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जबरदस्तीने कामगारांना स्वेच्छा निवृत्ती देण्यात येऊ नये व कुठल्याही प्रकारे कामगाराचा छळ करण्यात येऊ नये अशा स्पष्ट सूचना आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.

यावर अंमलबजावणी न झाल्यास योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी खडसावून सांगितले. आयोजित बैठकीस विजय क्रांती संघटना अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार, राजुरा चे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, विजय ठाकरे ,प्रवीण लांडगे, अंबुजा सिमेंट कंपनी तथा एसीसी सिमेंट कंपनीचे कामगार व विजय क्रांती संघटनेचे अन्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!