Chandrapur Chhatrapati festival
Chandrapur Chhatrapati festival : चंद्रपूर :- छत्रपती महोत्सव समितीच्या वतीने तीन दिवसीय छत्रपती महोत्सव 2025 मोठया जल्लोषात पार पडला. तीन दिवसीय महोत्सवमध्ये विविध सांस्कृतीक क्रीडा व प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती महोत्सवाचे उदघाट्न मॅरेथॉन स्पर्धेने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या हस्ते करण्यात आले, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात शिवकाळावर आधारित रंगतदार नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. Chhatrapati festival 2025
19 फेब्रुवारी ला शिवजन्मोत्सव पालखी सोहळ्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवन काळातील महत्त्वाच्या 14 प्रसंगावर तयार करण्यात आलेले देखावे आकर्षित करणारे होते. यामध्ये शिवाजी राजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेक आणि शेवट महात्मा जोतिबा फुले शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढतात व पहिली शिवजयंती साजरी करतात हा देखावा होता. हे आकर्षक देखावे सिव्हिल लाईन गणेश मंडळ, हिवरपुरी बाल गणेश मंडळ, क्षत्रिय माळी समाज मंडळ, ज्युबिली हायस्कुल, पोंभुर्णा शिक्षिका ग्रुप यांनी सादर केले. Chhatrapati festival winners list

पालखी मिरवणुकीचे उदघाटन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले तर याप्रसंगी खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार आणि चंद्रपूर शहरातील अनेक गणमान्य व्यक्ती यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मिरवणूक संपल्यावर गांधी चौक मैदानात शिवव्याख्याते राजदादा घुमणार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 20 फेब्रुवारी ला शेवटच्या दिवशी सर्व कार्यक्रमाचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आरटीई मधील पहिल्या फेरीमधील यादी जाहीर
तसेच महाराष्ट्रील सुप्रसिध्द शिवशाहीर राजेंद्र कांबळे, अकलूज, सोलापूर यांच्या पोवाडा आणि शाहिरी या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली. यावेळी शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांनी आपल्या पहाडी व भारदस्त आवाजात अंगावर शहारे आणणारे शिवकालीन प्रसंग व शिवरायांचे कार्य आपल्या वाणीतून प्रस्तुत केले. या महोत्सवात प्राचार्य सूर्यकांत खणके यांना या वर्षीचा चंद्रपूर गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. (Shivshahir Rajendra Kamble performance)
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात छत्रपती महोत्सव आयोजन समितीचे निमंत्रक संतोष कुचनकर, अध्यक्ष आमदार सुधाकर अडबाले , कार्याध्यक्ष प्रा. डॉ. दिलीप चौधरी, सचिव हरीश ससनकर, उपाध्यक्ष राजीव कक्कड, सहसचिव बंडू धोत्रे, सहसचिव सोहेल शेख, कोषाध्यक्ष प्रा. निलेश बेलखेडे, सहकोषाध्यक्ष प्रा. वैशाली तुमराम, प्रसिद्धी प्रमुख विजय मुसळे मार्गदर्शक प्राचार्य सूर्यकांत खणके, नंदुभाऊ नागरकर, विजयराव टोंगे, समितीचे कार्यकारी सदस्य चंद्रकांत वैद्य, दिलीप रिंगणे, अँड. निमेश मानकर,
निशिकांत देशमुख, विनोद थेरे, दीपकभाऊ जेऊरकर, ॲड. देवा पाचभाई, राजेंद्र खांडेकर, दिलीप होरे, प्रा कमलाकर धानोरकर, पायल अन्नलदेवार, दुर्गा आत्राम, विजय बोरकर, विजय हेडाऊ, बाबा सातपुते, संजय तुरीले, आशिष येडांगे, अनिकेत बोबडे, विनोद गोवरदीपे, सुधाकर आंभोरे, प्रवीण पडवेकर, गोपाल अमृतकर, नकुल, अर्चना चौधरी, लताताई होरे, सारिका कुचनकर, रुपाली धांडे, दीक्षा, रजनी जेउरकर, उषा धांडे, चंदाताई वैरागडे, मीनाक्षी धुमणे यांनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.