Chandrapur District Central Bank Cyber Attack: ₹3.7 Crore Fraud Case
Chandrapur Cyber Crime
Chandrapur Cyber Crime : पदभरती प्रक्रियेत वादात आलेली चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक पुन्हा प्रकाशझोतात आली आहे, बँकेच्या ऑनलाइन व्यवहारात सायबर अटॅक झाल्याने अज्ञात चोरट्याने 3 कोटी 70 लाख 64 हजार 742 रुपयांवर डल्ला मारला, मात्र पोलिसांच्या समयसूचकतेने पोलिसांनी 1 कोटी 31 लाख 99 हजार 319 रुपये वाचविण्यात यश आले.
7 आणि 10 फेब्रुवारी दरम्यान झालेले अनेक ट्रांजेक्शन सायबर गुन्हेगारांनी दिल्ली आणि नोएडा येथील खात्यांवर वळते करत बँकेच्या सायबर सुरक्षेला धक्का दिलाय. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून RTGS केलेली रक्कम नागपूर येथील येस बँक च्या माध्यमातून लाभार्थी खात्यात जमा होते. (Cyber Fraud RTGS Scam)
चंद्रपुरात अखेर भ्रष्टाचाराचे आका अवतरले
7 आणि 10 फेब्रुवारी या दोन दिवसात 34 खातेदारांच्या खात्यामधून ही रक्कम RTGS करण्यात आली होती. या प्रकरणात जिल्हा मध्यवर्ती बँक “मेकर आणि चेकर” तर यस बँक बेनिफिशरी बँक आहे. मात्र आरटीजीएस केलेली रक्कम संबंधित खात्यांमध्ये जमा न झाल्याने व्यवस्थापनाला संशय आला. (Online Banking Fraud News)
चंद्रपूर येथील रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चंद्रपूर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केलाय.
10 फेब्रुवारीला नॅशनल सायबर रिपोर्टिंग पोर्टलवरून तक्रार दिल्यावर 33 आर्थिक व्यवहार फ्रीज करण्यात आले त्यामुळे बँकेचे 60 लक्ष 64 हजार 582 रुपये परत जमा झाले, 71 लक्ष 34 हजार 737 रुपये विविध बँक खात्याला होल्ड झाले असे एकूण 1 कोटी 31 लक्ष 99 हजार 319 रुपये वाचविले आहे, सध्या या प्रकरणी आयटी टीम, सायबर पोलीस व रामनगर पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहे.