Chandrapur district jobs for sound operators
Chandrapur district jobs for sound operators : जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या अधिनस्त असलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहासाठी लाईटींग व साऊंड सिस्टीममधील साहित्य हाताळण्याचे किमान एक वर्षाचे ज्ञान/ अनुभव असलेल्या व्यक्तिची मानधन तत्वावर आवश्यकता आहे. विविध व्यक्ती/ संस्थाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहातील साऊंड सिस्टीम तसेच लाईट ऑपरेटींग हाताळणे, सदर साहित्याची देखरेख व जतन करणे, तसेच वरिष्ठांनी वेळेावेळी केलेल्या आदेशाचे पालन करणे आदी कामांकरीता कंत्राटी पध्दतीने मासिक मानधन तत्वावर 11 महिन्याकरीता अस्थायी स्वरुपात साऊंड ऑपरेटर व लाईट आपॅरेटर यांची नियुक्ती करावयाची आहे. Sound operator job in Chandrapur
चंद्रपूर जिल्ह्यातील २.३६ कोटींची नागरिकांची फसवणूक
तरी इच्छुक पात्र व अनुभवी व्यक्तिंनी आवश्यक कागदपत्रासह सहा. करमणुक कर अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे. 3 मार्च नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अस्थायी स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरावयाच्या पदास खालील अटी व शर्ती लागू राहतील. How to apply for a sound operator job in Chandrapur?
लक्ष द्या
1. अर्जदार हा चंद्रपूर मुख्यालयी राहणारा असावा. 2. अर्जदाराची वयोमर्यादा 21 ते 50 पर्यंत असावी.
3. अर्जदारास लाईट व साऊंड सिस्टीममधील साहित्य हाताळण्याचे किमान 1 वर्षाचे ज्ञान/ अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच विविध निमशासकीय, खाजगी संस्था किंवा इतर ठिकाणी सदरबाबतचे अनुभव असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. 4. साऊंड ऑपरेटर पदांकरीता 10500 रुपये व लाईट ऑपरेटर करीता 10 हजार रुपये पदाचे मासिक मानधन रुपये राहील. 5. निवड केलेल्या उमेदवारास सभागृहातील कार्यक्रम सुरु होणेपासून ते संपेपर्यंत सभागृहात उपस्थित राहणे बंधनकारक राहील. Where to find cultural hall technician jobs?
6. निवड केलेल्या उमेदवाराची नेमणूक मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे अधिकारात 11 महिन्याच्या कालावधीकरिता अगदी तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने करण्यात येईल. 7. सदर कालावधीत त्यांची सेवा असमाधानकारक आढळुन आल्यास त्यांना कोणतीही पूर्व सुचना न देता सेवा केव्हाही समाप्त करण्यात येईल तसेच त्यांना कोणत्याही सेवाविषयक लाभाचा हक्क सांगता येणार नाही. 8. त्याचप्रमाणे नवीन नेमणुकीचा हक्क, रजा, भरपाई, वैद्यकीय परिपुर्ती, सेवाजेष्ठता, सेवानिवृत्ती वेतन इत्यादि सवलती अनुज्ञेय राहणार नाही. Light and sound system technician jobs near me
9. कंत्राटी तत्तवावरील नियुक्तींचा सदर कालावधी संपल्यानंतर त्यांची सेवा आपोआप संपुष्टात येईल. 10. उमेदवारांची सेवा समाधानकारक वाटल्यास त्यांना पुढील कालावधीकरीता जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत कंत्राटी तत्तवावर मुदतवाढ देण्याचे अधिकार मा. जिल्हाधिकारी यांनी राखुन ठेवले आहे.
11. नियुक्ती कालावधी संपण्यापूर्वी त्यांना सेवेचा त्याग करावयाचा असल्यास त्यांनी या कार्यालयास 1 महिन्याचे अगोदर लेखी नोटीस देणे आवश्यक राहील. तशी नोटीस त्यांनी सादर न केल्यास त्यांचे 1 महिन्याचे मानधन कपात करण्यात येईल. 12. नेमून दिलेली कामे तसेच जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानूसार कामे करणे बंधनकारक राहील, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.