Chandrapur MNS agitation | चंद्रपुरात मनपाची धूळ आणि मनसेचे मास्क वाटप आंदोलन

Chandrapur MNS agitation

Chandrapur MNS agitation : चंद्रपूर : चंद्रपूर येथील नागरिकांना महानगरपालिकेने कोणतीही पूर्व सूचना न देता चंद्रपुरात ठिकठिकाणी रस्ते खोदल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मात्र याकडे लोकप्रतिनिधी आणि मनपाचे दुर्लक्ष होत असल्याने आज दिनांक 11 फेब्रुवारीला दुपारी चंद्रपूर शहरातील जटपूरा गेट येथे मनपाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात आक्रमक आंदोलन करण्यात आले. (Mns protest)

एक व्हाट्सएप संदेश, आणि निराधार महिलेला झाली मोठी मदत

आंदोलनादरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी मास्क लावून महानगरपालिकेचा जाहीर निषेध नोंदविला. 

चंद्रपूर शहरात जाण्यासाठी एकच मुख्य मार्ग असल्याने या रस्त्यावर महानगर पालिकेने कोणतीही पूर्व सूचना न देता खोदकाम केले यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह रुग्णांना सुद्धा या रस्त्यावरून येजा करताना त्रास सहन करावा लागत असताना याकडे मनपा आयुक्त जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे मनसेने आंदोलन केले व या रस्त्यावर मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना मास्कचे वाटप केले. येत्या काही दिवसात रस्त्याची दुरुस्ती न केल्यास मनपासमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी मनदीप रोडे यांनी दिला. (Chandrapur traffic issues)

भूमिगत गटार योजनेवरून मनपा विरुद्ध नागरिकांमध्ये आधीच रोष आहे, 15 वर्षापूर्वी सुद्धा चंद्रपुरात 100 कोटींची भूमिगत गटार योजनेचे काम करण्यात आले होते, मात्र सदर काम अयशस्वी झाल्याने आता 500 कोटींच्या भूमिगत गटार योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे.

यामुळे शहरातील मुख्य मार्ग खोदण्यात आल्याने नागरिकांना रहदारी करण्यासाठी धुळीचा सामना करावा लागत आहे, शहरातील वाहतूक व्यवस्था खोळंबून गेली आहे, मनसेने आज या विषयावर निषेध आंदोलन केले मात्र या आंदोलनाचा काय परिणाम होणार ही येणारी वेळ ठरवेल.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!