Chandrapur police transfers | चंद्रपूर पोलीस बदल्या, वादग्रस्त बढती

Chandrapur police transfers

Chandrapur police transfers : चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले असून त्यामध्ये वादग्रस्त अधिकाऱ्यांना बढती देण्यात आल्याचे चित्र आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी शुक्रवारी सायंकाळी चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश दिले.

चंद्रपूर जिल्ह्यातील 1 हजार 491 विद्यार्थी आरटीई साठी पात्र

एलसीबीचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी भद्रावतीचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षभरात काचोरे यांची चौथ्यांदा बदली झाली आहे. दुर्गापूर येथील पोलिस निरीक्षक लता वाडिवे यांची बदली भद्रावती येथे तर प्रभारी पोलिस उपाधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणारे पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांची दुर्गापुर पोलिस स्टेशनला बदली करण्यात आली आहे. (Chandrapur police inspector)

एलसीबीसाठी मोठी स्पर्धा

एलसीबीचे ठाणेदार महेश कोंडावार यांचा कार्यकाळ संपताच एलसीबीसाठी अनेक ठाणेदारांनी जोरदार प्रयत्न केले होते. जिल्ह्यातील चार ते पाच ठाणेदारांची नावे एलसीबीसाठी चर्चेत असताना अखेरीस भद्रावतीचे ठाणेदार अमोल काचोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. Local crime branch

वादग्रस्त अधिकाऱ्यांना बढती

अमोल काचोरे हे वरोरा पोलिस स्टेशनमध्ये असताना त्यांच्या कार्यकाळात एका आरोपीने पोलिस कोठडीत आत्महत्या केली होती. या घटनेनंतर त्यांची तातडीने बदली करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा त्यांना स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली असून त्यामुळे अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

या बदल्यांमुळे पोलिस दलात मोठ्या चर्चेला उधाण आले असून, वादग्रस्त अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर नेमण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

बदल्यांचा राजकीय आणि प्रशासकीय प्रभाव

या बदल्यांमुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेबाबत शंका उपस्थित केली जात असताना, काहींना मात्र नेहमीच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचा एकूणच कार्यभार आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी या बदल्यांचा परिणाम कसा होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

गुन्हेगारी संपुष्टात येणार काय?

एलसीबी म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक साठी अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावली होती, सर्व पोलीस अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील गुन्हेगारी संपविण्यासाठी पुढे आले, या पदावर बसलं की गुन्हेगारी संपुष्टात येते ही भावना फक्त नागरिकांच्या मनात असते अधिकाऱ्यांच्या नाही. जिल्ह्यातील मोठ्या पोलीस स्टेशनमध्ये वादग्रस्त अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारी संपुष्टात येणार हा फक्त जनतेच्या डोक्यात असलेला भ्रम आहे. चित्र याउलट दिसेल हे नक्कीचं. Chandrapur crime

कार्यकाळ

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचा कार्यकाळ तसा ठीक गेला, जाता जाता त्यांनी वाळू तस्करांवर लगाम घालण्याचा प्रयत्न केला, दुर्गापूर पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांचा कार्यकाळ चांगला राहिला, विशेष बाब म्हणजे सिनियर असताना सुद्धा त्यांना लहान पोलीस स्टेशन देण्यात आले होते. क्षमता असलेल्या अधिकाऱ्यांना लहान जबाबदारी तर वादग्रस्त हा शब्द पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना बढती असं चित्र जिल्ह्यात निर्माण झालं आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!