Chandrapur Power Plant Accident
Chandrapur Power Plant Accident : चंद्रपूर – धारीवाल पावर प्लांटमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेवर आम आदमी पक्ष चंद्रपूरने कठोर भूमिका घेतली असून, कंपनी प्रशासनाविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. LCPL कंपनीतील फील्ड ऑपरेटर कर्णधर अशोक शेरके यांचा कन्व्हेअर बेल्टमध्ये (Conveyor Belt Accident) अडकून मृत्यू झाला, ही घटना कंपनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे गंभीर उदाहरण आहे.
चंद्रपूर ते मुंबई रेल्वे सुरू होणार, आमदार जोरगेवार यांचा पाठपुरावा
घटनेचे वर्णन व प्रशासनाचे गैरप्रकार:
१. सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष: कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने अपघात घडला.
२. शव बेकायदेशीररीत्या हलवण्याचा प्रयत्न: मृतकाच् शरीरार तातडीने हलवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. (Dhariwal Company Negligence)
३. कामगार व नेत्यांना घटनास्थळी प्रवेश नाकारणे: कामगार संघटनांच्या नेत्यांना व आम आदमी पक्षाच्या प्रतिनिधींना घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात आले.
४. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न: कंपनीने अपघाताची जबाबदारी झटकण्यासाठी महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
५. पोलिस प्रशासनाची भूमिका: संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी कामगार व नेत्यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखून अन्यायकारक भूमिका घेतली.
आम आदमी पक्षाच्या मागण्या:
१. कंपनी प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
२. मृतकाचे शव बेकायदेशीररीत्या हलवण्याच्या व पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नांवर कायदेशीर कार्यवाही करावी.
३. कामगार व नेत्यांवर झालेल्या धक्का-बुक्कीबद्दल संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
४. कामगारांच्या सुरक्षेच्या तपासणीसाठी तात्काळ समिती स्थापन करावी.
५. सुरक्षेचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
६. जिल्ह्याला कायमस्वरूपी सहाय्यक कामगार आयुक्त द्यावा.
इशारा:
जर वरील मागण्या त्वरित पूर्ण झाल्या नाहीत, तर आम आदमी पक्ष कामगारांच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन उभारेल. कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती:
यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, कामगार नेते व युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महिला शहर अध्यक्षा तब्बसूम शेख, शहर संघटनमंत्री संतोष बोपचे, युवा जिल्हा संघटनमंत्री मनीष राऊत, युवा सचिव आदित्य नंदनवार, अजय बाथव, अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद सय्यद, वाहतूक अध्यक्ष जयदेव देवगडे, अनुप तेलतुबडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.