Chandrapur property tax updates
Chandrapur property tax updates : 9 लक्ष 78 हजार रुपयांची थकबाकी असणाऱ्या झोन क्रमांक 2 मधील नेहरू मार्केट येथील टिळक मैदान येथील 10 ओटे-गाळ्यांना मनपा कर वसुली पथकाने टाळे ठोकले आहे. मनपा कर विभागाद्वारे वारंवार सूचना देऊन, यापुर्वी तीनदा थकबाकीची नोटीस दिल्यानंतरही सदर मालमत्ता धारकांनी कराचा भरणा न केल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर
टिळक मैदान येथे गाळे असणाऱ्या विठाबाई निंबाळकर यांच्याकडे 62,922,देविदास राहुलकर यांच्याकडे 1,10,809,मंगला राऊत यांच्याकडे 63790,इंदिराबाई बनकर यांच्याकडे 67,790,किशोर येरणे यांच्याकडे 40,294,सईबाई निंबाळकर यांच्याकडे 1,37,293,अंजनाबाई खरतड यांच्याकडे 63,188,दिनेश पायधन यांच्याकडे 2,23,525,विजय आमटे यांच्याकडे 97,552 तर चंद्रभागा मंगरूळकर यांच्याकडे1,11,051 रुपयांची थकबाकी आहे.यापुर्वी तीनदा थकबाकीची नोटीस या सर्वांना बजाविण्यात आली होती. मात्र करचुकवेगिरी करत असल्याने मनपा कर विभागाने गाळे सील केले आहेत. Property tax defaulters
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची पथके सुटीच्या दिवशीही कार्यरत आहेत. थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे. काही मालमत्ता धारक हे धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात, अधिकतम धनादेश हे वटले जातात, मात्र जे धनादेश वटले जाणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई मनपातर्फे करण्यात येत आहे. Municipal tax recovery news
सदर कारवाई मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी ,कर विभाग प्रमुख अनिल घुले, श्रीकांत होकाम,मनोज सोनकुसरे,अनिल नन्हेट,प्रल्हाद भावरकर,नीरज कमटलवार,गोपाळ वाळके व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी केली.