chandrapur rto checkpost
chandrapur rto checkpost : चंद्रपूर येथील प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) मधील सहायक मोटार निरीक्षक लाच प्रकरण आणि एका खासगी कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडले गेल्याची घटना समोर आली आहे. ही कारवाई महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती लक्कडकोट RTO चेकपोस्टवर करण्यात आली.
लक्कडकोट RTO चेकपोस्टवरील बेकायदेशीर वसुली
महाराष्ट्र-तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील RTO चेकपोस्टवर बेकायदेशीर वसुली सुरू असल्याचे उघड झाले आहे. RTO अधिकारी लाच प्रकरण हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने चालू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. Amravati Acb
200 रुपयासाठी चंद्रपुरात नशेचा बाजार
या सततच्या वसुलीला कंटाळून एका ट्रक मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) तक्रार केली. तक्रारदाराचे ट्रक महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमध्ये वाहतूक करतात. कागदपत्रे व्यवस्थित असतानाही RTO अधिकाऱ्यांकडून लाच मागितली जात होती, त्यामुळे त्यांनी ही तक्रार नोंदवली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
या तक्रारीनंतर अमरावती ACB विभागाने सापळा रचला. 21 फेब्रुवारी रोजी पंचासमोर सहायक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी विभूते यांनी खाजगी एजंट जगदीश डफडे यांना तक्रारदाराकडून 500 रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने दिलेल्या नोटा स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. Chandrapur corruption
RTO चेकपोस्टवरील झडती आणि मोठा घोटाळा उघड
या कारवाईनंतर RTO चेकपोस्ट कार्यालयाची झडती घेण्यात आली. तेथे 56,100 रुपये रोख रक्कम आढळली. चौकशीत RTO लाच प्रकरणाचा पर्दाफाश झाला. विशेष म्हणजे, या रकमेची कोणतीही नोंद अधिकृत कॅशबुकमध्ये नव्हती.
अटक आणि पुढील कारवाई
सहायक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी विभूते आणि एजंट जगदीश डफडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या मोहिमेत पोलीस उपअधीक्षक मंगेश मोहोड, पोलीस निरीक्षक केतन मांजरे, योगेशकुमार दंदे, तसेच पोलीस कर्मचारी युवराज राठोड, राजेश मेंटकर, वैभव जायले आणि आशिष जांभळे यांनी सहभाग घेतला.
या कारवाईमुळे चंद्रपूर RTO घोटाळा उघडकीस आला आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांकडून आणि ट्रक मालकांकडून केली जात आहे.