Chandrapur Sand Mafia | तलाठी हल्ला प्रकरण, 2 आरोपींना अटक

Chandrapur Sand Mafia

Chandrapur Sand Mafia : 30 जानेवारीला भद्रावती तालुक्यातील कारेगाव येथे तलाठी अनंत गीते वाळू तस्करी रोखण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर वाळू तस्करांनी ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न व धक्काबुक्की करण्यात आला.

वाघाची शिकार, शिलॉंग मधून आरोपीला अटक


याबाबत तलाठी अनंत गीते यांनी शेगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध कलम 132, 296, 303(3), 3(2) व 48 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
शेगाव पोलिसांनी या प्रकरणात वाहन चालक 34 वर्षीय अनिल उर्फ शंभू नथ्थू भरडे रा.चंदनखेडा, 23 वर्षीय महेश गणेश गुंटिकवार यांना अटक केली. इतर आरोपींचा पोलिसांद्वारे शोध सुरू आहे. (Revenue Officer Attack)

2 वर्षांपासून जिल्ह्यातील वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया झाली नसल्याने वाळू तस्करी जोमात सुरू आहे, प्रशासनाला न जुमानता व आर्थिक संबंध जोपासत वाळू तस्करी सुरू आहे.


विशेष म्हणजे या वाळू तस्करी मध्ये जिल्ह्यातील नामवंत राजकीय पदाधिकारी यांचा सहभाग आहे.
महसूल विभाग तर निद्रा अवस्थेत असल्याने वाळू तस्करी बेलगाम झाली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!