Chandrapur sisters drowning । वैनगंगा नदीत भीषण दुर्घटना, तीन सख्य्या बहिणी बुडाल्या

Chandrapur sisters drowning

सावली : महाशिवरात्रीच्या निमित्ताने चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलाखाली आंघोळीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या पाच जणांना जलसमाधी मिळाली. यामध्ये तीन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी अंत झाला, तर दोघांना वाचविण्यात यश आले. ही हृदयद्रावक घटना दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. Vainganga River accident

बुडालेल्यांमध्ये प्रतिमा प्रकाश मंडल (२३), कविता प्रकाश मंडल (२२), लिपिका प्रकाश मंडल (१८) या बाबूपेठ, चंद्रपूर येथील रहिवासी होत्या. प्रसंगावधान राखत प्रणव वसंत मंडल (४०) यांनी प्रथमेश प्रणव मंडल (५) याला वाचवले, तर पोलिसांच्या मदतीने पुनम प्रणव मंडल (३०) यांना बचावण्यात यश आले. वृत्त लिहीपर्यंत कविता मंडल हिचा मृतदेह हाती लागला होता, तर इतर दोन बहिणींचा शोध सुरू होता. Maha Shivratri river tragedy

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे नवे शिलेदार पोलीस निरीक्षक अमोल काचोरे

घटना कशी घडली?

मंडल कुटुंबातील आठ सदस्य महाशिवरात्रीनिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थानाला निघाले होते. मात्र, मंदिरात मोठी गर्दी असल्याचा अंदाज घेत त्यांनी वैनगंगा नदीच्या पुलाखाली आंघोळ करून सोमनाथला जाण्याचा निर्णय घेतला. आंघोळी दरम्यान प्रतिमा, कविता, लिपिका, प्रथमेश आणि पुनम यांचा तोल गेल्याने ते पाण्यात बुडाले. प्रसंगावधान राखत प्रणव मंडल यांनी प्रथमेशला वाचवले, तर पुनम एका दगडाला अडकल्याने त्यांना सुरक्षित बाहेर काढता आले. मात्र, तिन्ही बहिणी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. Chandrapur family tragedy

बचावकार्य आणि पोलिसांचा तपास

घटनेची माहिती मिळताच सावली पोलिसांचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुनमला वाचवण्यात यश मिळवले. कविताचा मृतदेह तत्काळ सापडला, मात्र प्रतिमा आणि लिपिकाचा शोध बोटीच्या सहाय्याने सुरू आहे. सावलीचे ठाणेदार प्रदीप पुल्लरवार, पोलिस उपनिरीक्षक सचिन मुसळे, धीरज पिदुरकर, मोहन दासरवार, केवल तुरे आणि राहुल तुमरेटी हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. Chandrapur news today

मंडल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

प्रकाश मंडल आणि कल्पना प्रकाश मंडल यांच्या तीन मुली – प्रतिमा, कविता आणि लिपिका यांचा या घटनेत मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. प्रणव मंडल हे चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयात प्राध्यापक आहेत, तर त्यांच्या पत्नी पुनम शिकवणी वर्ग घेतात. त्यांना प्रतिमा मदत करायची. कविता आणि लिपिका शिक्षण घेत होत्या. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण मंडल कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!