Chandrapur water bill late payment penalty । चंद्रपुरात नळधारकांसाठी अलर्ट! देयक न भरल्यास मनपाची कठोर कारवाई

Chandrapur water bill late payment penalty

Chandrapur water bill late payment penalty : देयक प्राप्त होताच पहिल्या 15 दिवसांत देयकाचा भरणा करणाऱ्या नळधारकांसाठी चंद्रपुर महानगरपालिकेतर्फे 10 टक्के सूट देण्यात असुन त्यानंतरच्या 15 दिवसात देयकाचा भरणा करणाऱ्या नळधारकांना 5 टक्के सूट देण्यात येणार आहे. मात्र उपरोक्त कालावधीमध्ये देयकाचा भरणा न केल्यास देयक रकमेवर 2 टक्के प्रति माह दंड आकारण्यात येणार असुन जलमापकामधे कुठल्याही प्रकारची हेरफेर केल्याचे आढळल्यास दुपटीने कर आकारणी व 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती मनपा पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.  (Chandrapur water supply latest update)

chandrapur water supply latest update


   नळ कनेक्शन घेतांना अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या नावाने वेगवेगळे जोडणी घेण्यात आली आहे.परंतु अश्या नळांमधुन पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अश्या 47 अपार्टमेंटची नोंद घेऊन त्यांचे नळ कनेक्शन कपात करण्यात आले असुन एका अपार्टमेंटला एक नळ जोडणी या तत्वावर 25 एमएम किंवा 50 एमएम आकाराचे कनेक्शन घेण्याकरिता नोटीस देण्यात आली आहे. How to pay water bill online in Chandrapur 

राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा

       
   दरम्यान जलमापक यंत्र ( मीटर ) काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या 1560 नळ धारकांवर नळ कपातीची कारवाई करण्यात आली असुन 570 जलमापक यंत्र जप्त करण्यात आले आहे.तसेच मीटर काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या 2407 नळधारकांची नोंद घेण्यात आली असुन त्यांनी मीटर जोडणी न केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.   Municipal Corporation water disconnection notice  


   काही नळ ग्राहक हे पाणी वापराचा खर्च टाळण्याच्या दृष्टीने पाईपलाइनवर बसविण्यात आलेले जलमापक यंत्र काढुन पाणी भरत असतात. त्यामुळे अनेकदा  नागरिकांचे देयक हे शून्य रुपये येते.सदरची बाब नियमबाहा असल्याने असे प्रकार थांबविण्याच्या दृष्टीने येत्या 15 दिवसांत पाणी पुरवठा कार्यालयात प्रत्यक्ष अथवा भ्रमणध्वनी व्दारे संपर्क करून नळ जोडणी करून घेण्याच्या सूचनाही व्हॉल्वमनमार्फत सदर नळ धारकांना देण्यात आल्या होत्या. परंतु अजुनही काही नळ धारकांनी नळ जोडणी न केल्याने अश्या ग्राहकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.

how to pay water bill online in chandrapur


    नळ कपातीसाठी महानगरपालिकेमार्फत 6 पथक तयार करण्यात आले आहे. ज्या नळ ग्राहकांची नळ कपात करण्यात आलेली आहे अश्या ग्राहकांनी पुनश्चः नळ जोडणीकरिता आवश्यक शुल्क आकारणीचा भरणा करावा, यासाठी मनपा पाणी पुरवठा विभाग अथवा पाण्याची टाकी कार्यालय येथे संपर्क करण्याचे मनपाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!