Grand Chhatrapati Festival 2025 | छत्रपती महोत्सवाचा शानदार प्रारंभ – चंद्रपुरात मॅरेथॉन स्पर्धेत उत्साहाचा जल्लोष

Chhatrapati Festival 2025

Chhatrapati Festival 2025 : चंद्रपूर -:छत्रपती महोत्सव 2025 चे उदघाट्न आज गांधी चौक चंद्रपूर छत्रपती मॅरेथॉन ने संपन्न झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मॅरेथॉन ला हिरवी झेंडी दाखवून उदघाट्न केले. यावेळी आयोजन समितीचे अध्यक्ष आमदार सुधाकर अडबाले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील स्पर्धकानी मोठया संख्येने सहभाग घेतला सर्वं स्पर्धकामध्ये चैतन्यपूर्ण उत्साह होता. (Chandrapur Shiv Jayanti Celebration)

चंद्रपुरात नळ धारकांसाठी अलर्ट

शिवरायाच्या घोषणाने वातावरण दुमदुमले होते पारितोषिक विजेते गट 1 पुरुष वय 8 ते 14वर्ष प्रथम रोशन ठाकरे, द्वितीय कृष्णा पारखी, तृतीय ,कुशल कामडे गट 2 पुरुष खुला प्रथम भूषण आस्वले द्वितीय रितिक धोडरे तृतीय, पियुष गायधनी गट 1 महिला वय 8 ते 14 वर्ष प्रथम सखी दोरखंडे द्वितीय श्रेया येवले, तृतीय तेजस्वी ठाकरे गट 2 महिला खुला प्रथम रुचिका नागरकर, द्वितीय साक्षी पेलेजवार, तृतीय लावण्या नागरकर यांनी क्रमांक प्राप्त केले तर लक्ष्मी पुंगाटी हिने प्रोत्साहन पर पारितोषिक प्राप्त केले सर्व विजेते व सहभागी यांनी 20 फेब्रुवारी ला भव्य कार्यक्रमात बक्षीस दिले जाणार आहे. (Chhatrapati Marathon 2025)

यावेळी छत्रपती महोत्सव आयोजन समितीचे निमंत्रक संतोष कुचनकर कार्याध्यक्ष प्रा दिलीप चौधरी,सचिव हरीश ससनकर, उपाध्यक्ष राजीव कक्कड, सहसचिव बंडू धोत्रे, सोहेल शेख, कोषाध्यक्ष प्रा निलेश बेलखेडे सहकोषाध्यक्ष प्रा वैशाली तुमराम प्रसिद्धी प्रमुख विजय मुसळे मार्गदर्शक प्राचार्य सूर्यकांत खणके, नंदुभाऊ नागरकर, विजयराव टोंगे कार्यकारी सदस्य चंद्रकांत वैद्य, राजेंद्र खांडेकर, दिलीप रिंगणे, निमेश मानकर, दीपकभाऊ जेऊरकर, निशिकांत देशमुख, दिलीप होरे, विनोद थेरे, प्रा कमलकार धानोरकर, पायल अन्नदेलवार हे उपस्थित होते. संचालन हरीश ससनकर यांनी प्रास्ताविक दीपक जेऊरकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.निलेश बेलखेडे यांनी केले. मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनासाठी विजय बोरकर, जितेंद्र पिंपलशेंडे, मुकेश तेलतुंबडे, गोविंद पवार, आदर्श सर, नावेद व कृष्णा, रोशन बुजाडे यांनी सहकार्य केले.

Chhatrapati Marathon 2025


19 फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव पालखी मिरवणूक,
सायंकाळी 4 वाजता मार्ग गांधी चौक, जटपुरा गेट गांधी चौक या मार्गाने निघणार आहे. पालखी मिरवणूकमध्ये ढोल पथक लेझीम पथक व तसेच मिरवणुकीचे आकर्षण म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातील प्रसंगावर आधारित 10 देखावे राहील,मिरवनूक मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व शिवप्रेमी साठी ड्रेस, भगवा कुर्ता व पांढरा पायजामा, महिलांसाठी भगवी साडी अथवा ड्रेस यासह इच्छुकांना फेटे घालून देण्याची व्यवस्था राहणार आहे. (Shivaji Maharaj Palakhi Procession)

सायंकाळी 8 वाजता जाहीर व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराज व आजची लोकशाही या विषयावर राजदादा घुमनर यांचे राहणार आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!