Chhatrapati Shivaji Maharaj Memorial । शिव स्मारकासाठी आमदार जोरगेवार यांनी केली ५० लक्ष रुपयांच्या निधीची घोषणा

Chhatrapati Shivaji Maharaj Memorial

Chhatrapati Shivaji Maharaj Memorial : घुग्घूस येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्यासाठी जागेची परवानगी द्यावी, या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने लॉयड मेटल कंपनीच्या गेटसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले असून  स्मारकासाठी ५० लाख रुपये निधी जाहीर केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात भरदिवसा युवकाची हत्या

या आंदोलनात स्मारक समितीचे चेतन बोबडे, माजी सरपंच संतोष नुने, विवेक बोंढे, संजय तिवारी, सोनल भरडकर, अमित बोरकर, गणेश शेंडे, अनिल बाम, हेमराज बावणे यांच्यासह शिवप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

घुग्घूस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक तयार करण्यात यावे, अशी येथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे. यासाठी मुख्य चौकात असलेल्या लॉयड मेटल कंपनीच्या गेटसमोरील जागा घुग्घूसवासियांच्या वतीने सुचविण्यात आली आहे. सदर जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. मात्र, तेथे लॉयड मेटल कंपनीचा गेट असल्याने स्मारक उभारण्यास कंपनी व्यवस्थापनाने विरोध दर्शविला आहे. या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, घुग्घूस यांच्या वतीने वेळोवेळी आंदोलने केली जात आहेत. (Chhatrapati Shivaji public movement)

दरम्यान, आज गुरुवारी याच मागणीसाठी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, ही केवळ जागेची परवानगी मिळवण्यासाठीची लढाई नाही, तर आपल्या अस्मितेची, अभिमानाची आणि इतिहासाच्या जतनाची लढाई आहे. शिवराय हे केवळ एका काळापुरते मर्यादित नाहीत, ते अनंत काळासाठी प्रेरणादायी आहेत म्हणून त्यांचे भव्य स्मारक उभारणे ही आपली जबाबदारी आहे. (Shivaji Maharaj monument news)

आपल्या भागात वेगवेगळी विकासकामे होत आहेत, मोठमोठ्या उद्योगधंद्यांनी जागा व्यापली आहे. मात्र, शिवरायांच्या स्मारकासाठी जागेची परवानगी मिळावी यासाठी आपल्याला आंदोलन करावे लागते, हे निश्चितच दुर्दैवी आहे. पण आपण माघार घेणारे नाही. ही मागणी आम्ही शासन दरबारी मांडणार आणि योग्य ती परवानगी मिळवणार, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी घुग्घूसवासियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!