Criminal arrest in Chandrapur
Criminal arrest in Chandrapur : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आणि रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपी कोरोना काळात आकस्मिक अभिवचन रजेवर बाहेर आले होते. मात्र, रजेचा कालावधी संपल्यानंतर ते परत न जाता ४ वर्षांपासून फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष मोहिम राबवत त्यांचा शोध घेतला आणि अखेर दोघांना अटक करण्यात यश मिळवले.
उन्हाळा येतोय, चंद्रपूरकरांनो सावधान
इंदिरानगर, चंद्रपूर येथील खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला आरोपी विकास उर्फ विक्की बद्रीप्रसाद तिवारी हा ४५ दिवसांच्या रजेवर नागपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला होता. तसेच, राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दीपक उर्फ सुरेश यशवंत पुणेकर यानेही कारागृहातून रजा घेतली होती, परंतु दोघेही परत न जाता फरार झाले होते. Chandrapur police latest news
शिवद्रोही प्रशांत कोरटकर ला अटक करा, संभाजी ब्रिगेडची मागणी
गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेले आरोपी फरार असल्याने त्यांना अटक करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिले होते. त्यानुसार, २२ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष फरार बंदी शोध मोहीम राबवली. त्यादरम्यान, दोन्ही आरोपींचा ठावठिकाणा मिळवत त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना संबंधित पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करून त्यांची रवानगी नागपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. Chandrapur LCB operation success
यशस्वी कारवाई करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी :
ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, स्वामीदास चालेकर, प्रकाश बल्की, अजय बागेसर, किशोर वैरागडे, नरोटे आणि अराडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.