Effective Encroachment Removal
अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई
Effective Encroachment Removal : शहरात रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय थाटणाऱ्या अतिक्रमणधारकांवर चंद्रपूर महानगरपालिकेने कारवाई केली असुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते बिनबा गेट परिसरातील अतिक्रमण शहर पोलीस स्टेशन व वाहतूक पोलिस विभागाशी समन्वय साधुन काढण्यात आले आहे.
शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांची ऑन द स्पॉट सुनावणी
अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवितांना या भागातील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात काढुन रस्ते मोकळे करण्यात आले आहे. पत्र्याचे शेड लाऊन फुटपाथवर व रस्त्यावर अतिक्रमण केले असल्याचे आढळुन आल्याने रस्त्यावर आलेले दुकानाचे शेड त्या दुकानदारांना स्वतःहुन काढण्यास लावण्यात आले तर काही शेड कटरने काढण्यात आले. (Illegal Street Encroachments)
ठेले जप्त
भंगाराची दुकाने हटविण्यात आली त्याचप्रमाणे त्यांच्याकडुन रस्त्यांवर जो मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता तो हटवुन कचरा करण्याबाबत दंड ठोठावण्यात आला व रस्त्यावर उभे करण्यात आलेले ठेले सुद्धा जप्त करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासुन रस्त्यावरील अतिक्रमण धारकांनी स्वतः हुन अतिक्रमण काढण्याच्या सुचना मनपातर्फे देण्यात आल्या होत्या .मात्र त्याकडे दुर्लक्ष करून,कारवाईची तमा न बाळगता अतिक्रमण उभेच होते त्यामुळे मनपा,पोलीस विभाग व वाहतुक पोलीसांद्वारे कारवाई करण्यात आली आहे. तसेच फुटपाथ व सार्वजनिक रस्त्यांवर पुन्हा फुटपाथवर अतिक्रमण न करण्याच्या सूचना अतिक्रमणधारकांना देण्यात आल्या आहेत. कारवाई दरम्यान अतिक्रमण निर्मुलन पथक,पोलीस पथक पूर्णवेळ उपस्थीत होते.