Eklavya Model School principal transfer | प्राचार्य संजय बोंतावार यांची बदली रद्द करा – शाळा व्यवस्थापन समितीची मागणी

Eklavya Model School principal transfer

Eklavya Model School principal transfer : चंद्रपूर जिल्ह्यातील देवाडा येथील एकलव्य मॉडेल निवासी शाळेचे प्रभारी प्राचार्य संजय बोंतावार यांची खोट्या तक्रारीच्या आधारावर बदली करण्यात आल्याने शाळा व्यवस्थापन समितीने नाराजी व्यक्त केली आहे. एका शिस्तप्रिय व विद्यार्थिवर प्रेम करणाऱ्या शिक्षकाची अंतर्गत राजकारणाचा बळी गेल्याची भावना समितीने पत्रकार परिषदेत मांडली. त्यांनी प्राचार्य बोंतावार यांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा देवाडा शाळेत रुजू करण्याची मागणी केली आहे. Eklavya Model School Chandrapur issue

तीन सख्ख्या बहिणी वैनगंगा नदीत बुडाल्या, चंद्रपूर हादरलं

शिस्तप्रियतेमुळे प्राचार्यांना लक्ष्य

एकलव्य मॉडेल निवासी शाळा ही भारत सरकारच्या आदिवासी विभागामार्फत चालवली जाणारी जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे. विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीने शाळेत मोबाईल वापरास बंदी घालण्याचा ठराव पालकांच्या सहमतीने मंजूर केला होता. मात्र काही विद्यार्थ्यांनी हा ठराव नाकारत मोबाईल, तंबाखू व अन्य साहित्य लपवून ठेवले. School mobile phone ban controversy

राजुरा येथे वर्धा नदीत बुडून 3 मुलांचा मृत्यू

प्राचार्य बोंतावार यांनी हे आक्षेपार्ह साहित्य शोधून काढल्यानंतर त्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना जाब विचारला. मात्र, काही उद्धट विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी मारहाण केल्याचा खोटा आरोप पालकांसमोर केला. या तक्रारीच्या आधारे प्रशासनाने प्राचार्य बोंतावार यांची तत्काळ बदली केली, यामुळे व्यवस्थापन समितीने संताप व्यक्त केला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये हळहळ, व्यवस्थापन समितीची मागणी

प्राचार्य बोंतावार यांनी शाळेत रुजू झाल्यापासून शिस्तबद्ध शिक्षण पद्धती राबवून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावली होती. मात्र, अंतर्गत राजकारण व बाहेरील राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांचा अवास्तव बळी गेला, अशी खंत व्यवस्थापन समितीने व्यक्त केली.

प्राचार्य बोंतावार यांची बदली झाल्याचे कळताच विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त झाली. काही विद्यार्थ्यांनी अश्रू ढाळले व हंबरडा फोडला. त्यामुळे प्राचार्य बोंतावर यांना पुन्हा एकलव्य मॉडेल निवासी शाळेत रुजू करण्याची मागणी व्यवस्थापन समितीने केली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!