Eknath shinde birthday celebrations in bhadrawati
Eknath shinde birthday celebrations in bhadrawati : भद्रावती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते मा. ना. श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भद्रावती शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी, चंद्रपूरच्या सौ. मिनलताई आत्राम यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.
चिमूर ला जात आहात? तर आधी ही बातमी वाचा
या विशेष प्रसंगी, भद्रावती शहरातील संपूर्ण ऑटोचालक बांधवांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, गजानन महाराज मतिमंद विद्यालय येथे विद्यार्थ्यांना भोजनदान व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. सौ. मिनलताई आत्राम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये बाळूभाऊ उपलंचीवार, प्रकाश मेंढे, नानाभाऊ दुर्गे (माजी नगरसेवक), योगेश म्यॅनेवार (तालुका प्रमुख, कामगार संघटना), मोहन कोरवन, विवेक दुर्गे, अभय दुर्गे, सचिन जयस्वाल, राधाबाई कोल्हे, मंदाताई धांडे, प्रेमिला कृष्णपलीवार, विधाताई कुचणकर, सुरेखा देठे व इतर शिवसैनिकांचा समावेश होता.

या निमित्ताने शिवसेना पक्ष बळकट होवो, पक्षप्रमुख मा. ना. श्री एकनाथ शिंदे साहेब यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.