House fire incident
House fire incident : गुरुवारी सकाळच्या सुमारास गंज वॉर्डात घर जळाल्याची घटना घडली. दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन घराची पाहणी केली.
पुरूषोत्तम गोवर्धन यांचे हे घर असून, घटनेच्या वेळी घरात कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. आमदार किशोर जोरगेवार यांनी पीडित कुटुंबाला आर्थिक मदत दिली असून, तात्काळ पंचनामा करून शासकीय मदत देण्याच्या सूचना तहसील विभागाला दिल्या. (Ganj Ward fire news)
चंद्रपुरात भरदिवसा युवकाची धारदार शस्त्राने हत्या
पुरूषोत्तम गोवर्धन हे सकाळच्या सुमारास भाजीपाला विकण्यासाठी बाजारात गेले होते. दरम्यान, त्यांच्या घरातून आगीचा धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित ही माहिती पुरूषोत्तम गोवर्धन यांना दिली. स्थानिक नागरिकांनी बोरवेलच्या पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. या घटनेत गोवर्धन कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी गोवर्धन कुटुंबीयांची भेट घेऊन घराची पाहणी केली. तसेच, तहसीलदारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्वरित पंचनामा करून आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या. आग कशाने लागली याचे कारण अद्याप कळलेले नाही.










