How to pay property tax in Chandrapur | मालमत्ता करात सूट हवी तर करा हे काम

How to pay property tax in Chandrapur

How to pay property tax in Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 15 फेब्रुवारी पर्यंत थकबाकीसह मालमत्ता कराचा एकरकमी भरणा करणाऱ्याना शास्तीत सवलत देण्यात येत ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास 50 टक्के तसेच ऑफलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास 45 टक्के शास्तीत सवलत देण्यात येत आहे.सवलत केवळ 15 फेब्रुवारी पर्यंतच असल्याने अधिकाधिक मालमत्ता धारकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  


   सदर योजनेचा आतापर्यंत 5241 मालमत्ता धारकांनी लाभ घेतला असुन एकुण 3 कोटी 96 लक्ष 58 हजार 420 रकमेचा भरणा या योजनेअंतर्गत करण्यात आला आहे. 15 फेब्रुवारी नंतर थकबाकीसह पूर्णतः कराचा भरणा करण्याऱ्या मालमत्ता धारकांना ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास 25 टक्के तसेच ऑफलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास 22 टक्के शास्तीत सूट देण्यात येणार आहे. ही सूट 31 मार्च पर्यंत लागू अराहणार असुन कर भरणा करणे सुविधेचे व्हावे या दृष्टीने 31 मार्च पर्यंत येणाऱ्या प्रत्येक सुटीच्या दिवशी मालमत्ता कर भरणा कार्यालय सुरु राहणार आहे.  (Chandrapur Municipal Corporation property tax discount)

चंद्रपूर मनपाची मोठी कारवाई, 10 गाळे केले सील


   महापालिका क्षेत्रात 80 हजाराहुन अधिक मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करण्यात येते. कर न भरल्यास दंड वसुली तसेच प्रसंगी मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येते. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने यंत्रणा जोमात कामाला लागली आहे. (Chandrapur property tax penalty waiver)


    चंद्रपूर महानगरपालिकेचे स्वतःचे उत्पन्न वाढुन कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर किरकोळ खर्च पालिकेला स्वतःच्या उत्पन्नातून भागविण्याचे दृष्टीने मालमत्ता कराची वसुली नियमित व प्रभावी होण्याकरीता शासनाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये सुधारणा करून विहित कालावधीनंतर शास्ती लागु करण्याची तरतूद केलेली आहे. अश्या प्रकारे लागु होणाऱ्या शास्तीमध्ये पुर्णतः किंवा अंशतः सूट देण्याचे अधिकारी महानगरपालीकेस आहेत.


    मालमत्ता कराच्या प्रभावी वसुलीकरीता व संभाव्य उद्दिष्ट पूर्ती करीता मनपातर्फे शास्तीत सवलत जाहीर करण्यात आली आहे. 15 फेब्रुवारी पूर्वी या शास्ती माफीचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!