illegal sand mining cases
illegal sand mining cases : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आणि भद्रावती येथे स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून अवैध रेती उत्खनन करणाऱ्या टोळ्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. illegal sand mining report
राजुरा पोलिसांची कारवाई : दोन ट्रॅक्टरसह १६.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
आज दिनांक १२ फेब्रुवारी २०२५, रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मौजा गोमनी नाल्यातून अवैधरित्या रेती चोरी करून वाहतूक केली जात असल्याचे समजले. त्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत दोन ट्रॅक्टरसह एकूण १६,१०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चंद्रपूर शहरातील भ्रष्टाचाराचे आका कोण ?
आरोपींची माहिती:
१) अरुण श्रीधर मालेकर (वय ३९ वर्षे, व्यवसाय – मजुरी, मालक)
२) शैलेश नामदेव तलांडे (वय २४ वर्षे, व्यवसाय – ड्रायव्हर)
३) संदेश मारोती मुसळे (वय २६ वर्षे, व्यवसाय – ड्रायव्हर)
(सर्व राहणार आर्वी, तालुका – राजुरा, जिल्हा – चंद्रपूर)
गुन्हा आणि कलमे:
वरील आरोपी अवैधरित्या रेती चोरून वाहतूक करताना मिळून आल्याने पोलीस ठाणे राजुरा, अप. क्र. ५६/२०२५ अंतर्गत पुढील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे :
- कलम ३०३(२) भारतीय दंड संहिता
- कलम ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६
- कलम १, २, ३ गौण खनिज अधिनियम, १९५२
- कलम १३०(१)/१७७, ५० मोटार वाहन कायदा
या कारवाईमुळे राजुरा परिसरातील अवैध रेती उत्खनन करणाऱ्या टोळ्यांना मोठा झटका बसला आहे.
भद्रावती येथे गुन्हे शाखेची कारवाई : एक ट्रॅक्टरसह ६.६० लाखांचा मुद्देमाल जप्त
आज दिनांक १२ फेब्रुवारी २०२५, रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा मांगली नाल्यातून अवैधरित्या रेती चोरी होत असल्याचे समजले. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून छापा मारला आणि एक ट्रॅक्टरसह ६,६०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. sand mafia activities
आरोपींची माहिती:
१) समीर बंडू चौधरी (वय २१ वर्षे, व्यवसाय – चालक)
2) भारत वसंत बोढेकर (वय २४ वर्षे, व्यवसाय – शेती)
(दोघे राहणार मांगली, तालुका – भद्रावती, जिल्हा – चंद्रपूर)
गुन्हा आणि कलमे:
वरील आरोपींनी अवैधरित्या रेती चोरून वाहतूक करत असताना मिळून आल्याने पोलीस ठाणे भद्रावती, अप. क्र. ३९/२०२५ अंतर्गत खालील कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे : कलम ३०३(२) भारतीय दंड संहिताकलम १७७, १९२ मोटार वाहन कायदा (sand mining police action)
पोलिसांच्या कठोर कारवाईने अवैध रेती तस्करांमध्ये खळबळ
राजुरा आणि भद्रावती येथे स्थानिक गुन्हे शाखेने अवैध रेती तस्करी करणाऱ्या टोळ्यांवर मोठी कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे परिसरातील रेती चोरी करणाऱ्या तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, अवैध रेती तस्करीस आळा घालण्यासाठी पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पथकाने केली.