Indian Constitution Burning Incident
Indian Constitution Burning Incident : समता सैनिक दल,भारतीय बौद्ध महासभा,रिपब्लिकन पक्ष, डॉ बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील बौद्ध विहार कमिटी सामाजिक धार्मिक आंबेडकरी चळवळीतील राजकीय प्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांच्या पुढाकारातून अमृतसर येथील प्रजासत्ताक दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करत भारतीय संविधानाची प्रत जाळली या घटनेचा धिक्कार करण्यासाठी निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.
चंद्रपूर ग्रंथोत्सवातून वाचनसंस्कृतीला उजाळा – आमदार मुनगंटीवार
तत्पूर्वी मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा.राष्ट्रपती आणि मा.प्रधानमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले सदर निवेदनातून भारतात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनाचे प्रकार वाढत जात आसून भारतीय भारतीय राज्यघटनेचे पावित्राला गालबोट लावण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. (Ambedkarite Movement Protest)

या दोन्ही घटना अत्यंत गंभीर असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे यासाठी अश्या प्रवृत्तीच्या समाजद्रोही लोकांना देशद्रोहाचा खटला दाखल करून त्यांचे नागरिकत्व रद्द करून कठोर शिक्षा व्हावी या मागण्याचे निवेदन देण्यात आले,या सर्व घटनेमुळे जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा मलिन होत असल्याने अश्या प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना शासन प्रशासन आणि कायदेमंडळाद्वारे कठोर कायदे व्हावे ही विनंती केली.
या निवेदन सुपूर्द करताना आणि निषेध नोंदविण्यात येताना अशोक निमगडे, विशाल आलोने,अशोक टेंभरे,किशोर सवाणे,राजूभाऊ खोब्रागडे,सुरेश नारनवरे,महादेव कांबळे,शंकर वेलहेकर,राजकुमार जवादे, ॲड. राजस खोब्रागडे बुद्धप्रकाश वाघमारे,राजेश वनकर विजय करमरकर,सुशील बुजाडे वामनराव चांद्रिकापुरे,चेतन पाटील, विद्याधर लाडे,मुन्ना खोब्रागडे, प्रमोद मून,बाजीराव उंदिरवाडे, सिद्धार्थ सुमन,संतोष रामटेके, मृणाल कांबळे,निर्मला नगराळे, वर्षा घडसे निर्मला पाटील, पंचफुला वेल्हेकर छाया थोरात,अनिता जोगे,आनंद वनकर, सिध्दार्थ धोटे,यशवंत मुंजमकर,दिलीप डांगे यांच्या सोबत असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.