Investment fraud case Chandrapur | हैद्राबादच्या कंपनीकडून चंद्रपुरातील नागरिकांची 2.36 कोटींची फसवणूक

Investment fraud case Chandrapur

Investment fraud case Chandrapur : आपल्या कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवून गोरगरिबांची तब्बल 2 कोटी 36 लाख 60 हजार रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी हैद्राबाद येथील ग्रँड फॉच्युन इन्फ्रा डेव्हलपर्स या कपंनीविरुध्द तसेच आरोपी टेकुला मुक्तीराज रेड्डी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आाहे. याबाबत अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत असून आरोपीचा शोध घेणे सुरू असल्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर चिकनकर यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण ) अधिनियम 1999 अन्वये नोंद गुन्ह्यातील आरोपी टेकुला मुक्तीराज रेड्डी, रा. घर नं 1-6-174 ए/बी,  गंगापुत्र कॉलनी, मुर्शीदाबाद, आंध्रप्रदेश याच्याविरुद्ध फिर्यादी रेवनाथ आनंदराव एकरे, रा.वार्ड क्र.3, गडचांदुर, यांच्या लेखी रिपोर्ट वरून पो.स्टे रामनगर येथे अपराध कलम 406, 420, 465, 568, 471, 34.भादंवि सहकलम 3, 4 महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 अन्वये ग्रॅन्ड फॉच्युन इंन्र्फॉ डेव्हलपर्स  कंपनी हैद्राबाद विरुध्द गैरव्यवहारप्रकरणी  गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Grand Fortune Infra Developers scam)

गडचिरोली जिल्ह्यातील शासन मान्य कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी

        आरोपी टेकुला मुक्तीराज रेड्डी (Tekula Muktiraj Reddy fraud) याने ग्रॅन्ड फॉच्युन इंन्र्फॉ डेव्हलपर्स  कंपनी हैद्राबाद स्थापन करून विविध स्किमद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील गोरगरीब लोकांची फसवणूक केली. त्याच्या कंपनीमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. याबाबत रेवनाथ आनंद एकरे (46 वर्षे) रा. वार्ड न. 3, पोलीस स्टेशनच्या मागे गडचांदूर  यांनी पो.स्टे.  रामनगर येथे दिली असून सदरचा गुन्हा 18 नोव्हेंबर 2022 रोजी नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचे तपासात आरोपीने 2 कोटी 36 लक्ष 60 हजार रुपयांची फसवणुक केल्याचे दिसून आलेले आहे. (Ponzi scheme Hyderabad company)

या गुन्ह्यातील आरोपी टेकुला मुक्तीराज रेड्डी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून सदर गुन्ह्यातील गुंतवणुकदारांना आवाहन करण्यात येते की, आजपावेतो ज्या गुंतवणुकदारांनी परिशिष्ट क्र. 1 चे फॉर्म भरून दिले नाही, त्यांनी आठ दिवसाचे आत आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे जमा करावे. तसेच आरोपीचा सुगावा लागल्यास पोलिस नियंत्रण कक्ष, चंद्रपूर 07172-273258, 07172-264702 तसेच तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर चिकनकर (मो. 9359258365) या क्रमांकावर आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे कळवावे, असे पोलिस विभागाने कळविले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!