Job fair near me 2025
Job fair near me 2025 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर व मॉडल करीअर सेंटर चंद्रपूर, सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही आणि राष्ट्रीय एस.सी.,एस.टी.ओ.बी.सी, क्रांतीदल यांच्या तर्फे 13 फेब्रूवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हातील 10 वी, 12 वी, आय.टी.आय, पदविका, पदवी इत्यादी बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आणि राज्यातील नामांकित उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क होण्यासाठी सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. (Career opportunities for freshers)
मालमत्ता करात सूट हवी तर करा हे काम
सदर रोजगार मेळाव्यातून 1 हजार पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार असून मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्या सहभागी होत आहे. या मेळाव्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.
यामध्ये मल्टीव्हेव पॉलिफायबर, चंद्रपूर यांच्या लूम ऑपरेटर, हेल्पर, अकाऊंट मॅनेजर, वाईडर मॅन क्वॉलिटी सुपरवायझर, क्लिनर, एस.बी.आय. लाईफ इंन्सुरन्स चंद्रपूर फिल्ड वर्कर, विदर्भ क्लिक वन सोल्युशन यांचा फिटर, वेल्डर इलेक्ट्रिशियन, डेक्सॉन इंजिनिअरींग प्रा. लि. नागपूर यांच्या मोटार मॅकेनिकल, इलेक्ट्रिशिअन, डिझेल मॅकेनिकल, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन मुंबई यांच्या हॉटेल मॅनेजमेंट, टू व्हिलर, फोर व्हिलर दुरुस्ती, कंट्रक्शन इलेक्ट्रिशियन, नर्सींग, आय.सी.आय. सी. आय.फाउंडेशन पांगडी, चंद्रपूर यांचे सौरउर्जा इलेक्ट्रिशिअन, बांबू संशोधन केंद्र, चिचपल्ली यांचे बांबू हस्तकला व नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नर्सिग, असिस्टंट, घरगुती सहायक, फिजिओथेरेपिस्ट, असिस्टंट आदी कंपनीमार्फत नोकरी करण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे. (Best companies hiring now)
सदर कंपन्यामध्ये विविध पदे असल्याचे उद्योजकांकडून कळविण्यात आले आहे. मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे झेरॉक्स प्रतीसह (कमीत कमी तीन) उपस्थित राहावे. मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरीता https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करावी व ऑनलाईन अप्लाय सुध्दा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्याची विशेष बाब म्हणजे यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अधिक माहिती करीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172 -252295 येथे संपर्क करावा. (Top industries hiring in India)
उमेदवारांना रोजगार व स्वंय रोजगार करण्याकरीता कर्जविषयक माहिती देण्यासाठी संत रोहितदास चर्मोउद्योग माहमंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक मागास महामंडळ, महात्मा फूले मागासवर्ग महामंडळ, वसंतराव नाईक विमूक्त जाती व भटक्या जाती महामंडळ, इतर मागासवर्ग महामंडळ, अपंग महामंडळ, अण्णा साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, इत्यादी महामंडळे सदर मेळाव्यात मार्गदर्शनाकरीता येणार आहे. तरी जिल्हातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होण्याचे व मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त भै.गो. येरमे यांनी केले आहे.