Kombda Bazar
Kombda Bazar : काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे कोंबडा बाजाराचा उत्सव सुरू झाला होता, मात्र महिना झाल्यावर आता तो बाजार जिवती येथील माणिकगड किल्ल्याजवळ सुरू करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, आनंदवनला मोठी भेट
कोंबडा बाजाराचे मुख्य आयोजक सचिन व त्याचे 4 ते 5 साथीदार आहे, सर्वांना फुलांची पाकळी देत निर्भीडपणे हा बाजार सध्या चांगला फुलला आहे.
कोंबडा बाजार तीन दिवस म्हणजे बुधवार, शुक्रवार व रविवारी यादिवशी तेलंगणा व चंद्रपूर जिल्ह्यातील शौकीन कोंबड्यावर आपली बाजी लावतात.
काती लागून मृत्यू झालेला कोंबडा हरतो, आणि त्या बदल्यात पैसे लावणाऱ्या मिळतो बक्कळ पैसा.
एकीकडे पोलीस अधीक्षक प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रार निवारण कार्यक्रमाचे आयोजन करीत नागरिकांच्या समस्या ऐकत आहे तर दुसरीकडे जिवती मध्ये अवैध धंद्याना चालना देण्याचे काम सुरू आहे.