Legal action against Prashant Koratkar | प्रशांत कोरटकरच्या विवादास्पद विधानांनी शिवप्रेमींचा रोष, गुन्हा नोंदवून अटक करण्याची मागणी

छत्रपतींच्या अपमानाला शिवप्रेमींचा जोरदार प्रतिकार, पोलिसांकडे कारवाईची मागणी

Legal action against Prashant Koratkar : चंद्रपूर: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या तसेच इतिहासतज्ञ श्री इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर (नागपूर) यांच्या विरोधात शिवप्रेमींचा रोष वाढत आहे. दिनांक २५ फेब्रुवारीला मध्यरात्री प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजीत सावंत यांच्या मोबाईलवरून फोन करून धमकी दिली. या संभाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी अभद्र भाषा वापरली असून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आक्षेपार्ह टीका केली. Threats to historian Indrajit Sawant

चंद्रपुरात 3 सख्य्या बहिणीचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू

या संभाषणात प्रशांत कोरटकर यांनी खालील विवादास्पद विधाने केली:
१) “संभाजी महाराज अय्याश होते, हे लोकांना सांगा.”
२) “बाजीप्रभू देशपांडे नसते तर तुमचा महाराज आज जिवंत नसता.”
३) “तुमचे महाराज पळून गेले.”
४) “जेम्स लेन यांनी आपल्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे शिवाजीचा बायोलॉजिकल फादर कोण होता, हे लोकांना सांगा.”
५) “जास्त मराठा-मराठा करू नका, तुम्हाला ब्राह्मणांची औकात काय आहे ते दाखवू.”
६) “शिवाजी महाराजांना देशभर भालजी पेंढारकर यांनी पोहचविले, नाहीतर तुमचा छत्रपती कुठे गेला असता माहीतही पडलं नसतं.”

या घटनेमुळे देशभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. शिवप्रेमींनी प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या मागे कोणत्या विकृत शक्ती आहेत, याची सखोल चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवप्रेमींचा आग्रह आहे की, प्रशांत कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून तत्काळ अटक करण्यात यावी. Prashant Koratkar arrest demand

या संदर्भात इतिहासतज्ञ इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी अशी आक्षेपार्ह विधाने करणे हा केवळ व्यक्तिगत अपमान नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या इतिहासाविषयीचा अनादर आहे. या प्रकारच्या वक्तव्यांना नकार दिला पाहिजे.”

शिवप्रेमींनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडे या घटनेविषयी तक्रार नोंदवली आहे. त्यांची मागणी आहे की, या प्रकरणात त्वरित कार्यवाही करून प्रशांत कोरटकर यांच्याविरुद्ध कायदेशीर पावले उचलली जावीत.


अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप चौधरी, शरद पवार विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष ऍड. निमेश मानकर, शिवप्रेमी संतोष कुचनकर, निशिकांत देशमुख, दिलीप रिंगणे, गजानन नागपुरे आदींनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!