Leopard death Chandrapur | वन्यजीव मृत्यूचा नवा धक्का; चिमूरमध्ये बिबट्याचा पाण्यात बुडून मृत्यू

Leopard death Chandrapur

Leopard death Chandrapur : चिमूर: चंद्रपूर जिल्ह्यात महिन्याभरापूर्वी वाघाच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आल्याने वनविभाग सतर्क झाला आहे. जानेवारी महिन्यात जिल्ह्यात विविध कारणांमुळे चार वाघांचा मृत्यू झाला होता. आता फेब्रुवारी महिन्यात चिमूर वनपरिक्षेत्रात बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता उघडकीस आली आहे.

चिमूर वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र मुरपार नियतक्षेत्र मिनझरी येथे एका शेतात बिबट्याचा मृतदेह आढळला. वनरक्षक गस्तीवर असताना ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. (Leopard found dead well)

नागरिकांना असा मिळेल शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ

सदर बिबट मादी असून, तिचे अंदाजे वय 6 वर्षे होते. ती शिकारीच्या शोधात असताना विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. मृत बिबट्याचे सर्व अवयव शाबूत असल्याचे आढळले असून, अधिक तपासासाठी मृतदेहाचा रासायनिक विश्लेषणासाठी नमुना घेण्यात आला आहे. या घटनेच्या संदर्भात वनविभागाने वनगुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे.

Leopard found dead well

बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वनविश्रामगृह खडसंगी येथे करण्यात आले. त्यानंतर त्याठिकाणीच दफन करण्यात आले. या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊरकर, अमोद गौरकार, उत्तम घुगरे, सरूला भिवापुरे आणि रामदास नैताम उपस्थित होते.

या घटनेमुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने अशा घटनांना आळा घालण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!