Mahavitaran Abhay Yojana 2025
Mahavitaran Abhay Yojana 2025 : चंद्रपूर:- मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीज बिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन जागामालक किंवा ताबेदारांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल. त्यामुळे जागा वापरासह विजेची गरज असो किंवा नसो. मात्र वीज बिलांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी महावितरणच्या अभय योजनेअंतर्गत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अकृषक ग्राहकांना येत्या मार्चपर्यंत उपलब्ध झाली आहे.
चंद्रपुरात फ्लाईंग क्लबचे उदघाटन
दरम्यान, चंद्रपूर परिमंडळ मध्ये या योजनेत सहभागी वीज ग्राहकांनी सध्या विजेची गरज नसतानाही योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्ती मिळवली आहे. वीजपुरवठा खंडित झालेल्या तसेच कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व अकृषक वीजग्राहकांसाठी महावितरण अभय योजना दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. (Electricity Bill Waiver Scheme Maharashtra)
चंद्रपूर परिमंडळ कार्यालयांतर्गत अभय योजनेचा तपशील
चंद्रपूर मंडळातील 1925 ग्राहकांनी अभय योजनेत सहभाग नोंदविला असून त्यापैकी 1730 ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घेतलेला आहे. लाभ घेतलेल्या पैकी 124.41 (लाखात) ग्राहकांनी थकबाकी रकमेचा भरणा केलेला आहे.
गडचिरोली मंडळातील 3723 ग्राहकांनी अभय योजनेत सहभाग नोंदविला असून त्यापैकी 3540 ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घेतलेला आहे. लाभ घेतलेल्या पैकी 144.90 (लाखात) ग्राहकांनी थकबाकी रकमेचा भरणा केलेला आहे.
महावितरण अभय योजनेनुसार थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण 100 टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होत आहे.
तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी 10 टक्के तर उच्चदाब ग्राहकांना आणखी 5 टक्के सूट मिळत आहे. यासोबतच मूळ थकबाकीची सुरुवातीला 30 टक्के रक्कम भरून उर्वरित 70 टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यात भरण्याची देखील सोय आहे. थकबाकीमुक्तीसाठी वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता हरीश गजबे यांनी केले आहे. How to Avail Abhay Yojana for Electricity Bills
फ्रेंचायझीमधील ग्राहकांना सुद्धा लागू असलेल्या या अभय योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईट व मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज व थकबाकी भरण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या कार्यालयात संपर्क साधावा. Mahavitaran Abhay Yojana Benefits
महावितरण अभय योजनेचे ठळक मुद्दे:-
*घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अकृषक जागेसाठी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीची संधी.
*मागणीप्रमाणे त्वरित नवीन वीज जोडणी उपलब्ध.
*मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी 10 टक्के तर उच्चदाब ग्राहकांना 5 टक्के सूट.
*मूळ थकबाकीची 30टक्के रक्कम भरून उर्वरित 70 टक्के रक्कम सहा व्याज मुक्त हप्त्यात भरण्याची सोय.
*दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार वीज ग्राहकांना संधी.
*महावितरण अभय योजना येत्या दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार.