Remarkable Nagpur Divisional Level Competition । स्वामी विवेकानंद बालगृह, नागभीडच्या खेळाडूंची घवघवीत कामगिरी

Nagpur Divisional Level Competition

नागपूर विभागात अव्वल स्थान

Nagpur Divisional Level Competition: महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव आयोजित केला जातो. या स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या बालगृहातील लाभार्थ्यांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाते. शासकीय निरीक्षण गृह, बालगृह, स्वयंसेवी संस्था आणि इतर शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात.

कृषी मंत्री कोकाटे यांना आवरा, खासदार धानोरकर यांचं मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

अपुऱ्या सुविधा आणि मर्यादित संसाधनांच्या परिस्थितीतही स्वयंसेवी संस्थांमधील मुलांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे, हे विशेष कौतुकास्पद आहे. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही ही मुले उत्कृष्ट कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Chacha Nehru Children’s Festival Maharashtra)

विभागस्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव नागपूर येथे १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान पार पडला.
या स्पर्धेत लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था, ब्रह्मपुरी द्वारा संचालित स्वामी विवेकानंद बालगृह, नागभीड (जिल्हा चंद्रपूर) येथील लाभार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. (Swami Vivekananda Children’s Home Nagbhid)

स्पर्धेतील यश:

  • ६ ते १२ वयोगट:
    • कबड्डी – प्रथम क्रमांक
    • खो-खो – प्रथम क्रमांक
    • १०० मीटर धावणे – द्वितीय क्रमांक
  • १३ ते १८ वयोगट:
    • खो-खो – प्रथम क्रमांक
    • कबड्डी – द्वितीय क्रमांक

पुरस्कार वितरण समारंभात, महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्त श्रीमती अपर्णा कोल्हे यांच्या शुभहस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभात, स्वामी विवेकानंद बालगृह, नागभीडने नागपूर विभागात अव्वल स्थान पटकावल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तम चौधरी, अधीक्षक नरेंद्र बोरकर, गृहपिता रवींद्र राणे यांचे विशेष योगदान लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांनी मिळवलेले हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातून संस्थेच्या कामगिरीचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!