OBC protest in Maharashtra
ओबीसींच्या मागण्या पूर्ण केल्याच नाही मग भाजपाचा DNA ओबीसी कसा? सचिन राजूरकर
OBC protest in Maharashtra : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राज्यव्यापी एकदिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते.
चंद्रपुरात 11 सप्टेंबर 2023 रोजी रविंद्र टोंगे यांनी ओबीसी समाजातील विविध मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी आमरण उपोषण सुरू केले होते, त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis OBC promise) यांनी चंद्रपुरात येत रविंद्र टोंगे यांचं आमरण उपोषण सोडवीत ओबीसींच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले, मात्र फडणवीस यांचं आश्वासन फोल ठरल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाने एकदिवसीय धरणे आंदोलन केले. (National OBC Federation rally)
जिल्हा प्रशासनाची बदनामी खपवून घेतली जाणार नाही – पालकमंत्री अशोक उईके
जिल्हाधिकारी कार्यालय समोर या आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी संघाचे महासचिव सचिन राजूरकर म्हणाले की सरकारने ओबीसींच्या मागण्या पूर्ण करा आणि जर भाजपाचा DNA ओबीसी समाज असेल तर सरकारने लिखित दिलेले आश्वासन पूर्ण का करत नाही असाही सवाल केला. Maharashtra OBC protest 2024
ओबीसी समाजाच्या मागण्या काय?
बिहारच्या धर्तीवर (Bihar-style caste census OBC) जातनिहाय सर्वे करण्यात यावा,ओबिसी, व्हीजे,एनटी & विमाप्र विद्यार्थ्याना अजूनही आधार योजनेतील रक्कम मिळाली नाही ,जिल्हा मध्यवर्ती बँकेतील मागासवर्गीयाचे आरक्षण लागू करण्यात यावे,सारथी व बार्टी प्रमाणे दि.23 सप्टेंबर 2024 च्या मंत्री मंडळ निर्णयाप्रमाणे महाज्योती अंतर्गत नोंदणी असणाऱ्या ओबीसी, भटके विमुक्त व एस.बी.सी विद्यार्थी यांना २ वर्षांपासून प्रलंबित असणारी फेलोशिप तात्काळ अदा करावी. ओबीसी, विजा, भज व विमाप्र सुशिक्षित बेरोजगारा व्याज परतावा कर्ज मर्यादा 15 लक्ष करण्यात यावी,
ओबीसी मुलांना भारत सरकार स्कॉलरशिप 100%करण्यात यावी, अनुसूचित क्षेत्रात महामहीम राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार वर्ग 3 व वर्ग 4 चे 17 संवर्गीय पदे भरताना शंभर टक्के अनुसूचित जमातीतूनच भरली जातात त्यामुळे ओबीसी सहित इतर होणारा अन्याय तात्काळ थांबविण्यात यावा. ओबीसी, विजा,भज व विमाप्र समाजातील पाल्यांना सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणारे सर्व सफाई कामगांराना लाड समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने वारसा हक्काने नियुक्ती देण्यात यावी , केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी साठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा 15 लक्ष रुपये करण्यात यावी, आरक्षणाची 50% मर्यादा रद्द करण्यात यावी ,ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
मागण्याचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष यांना पाठविण्यात आले तर राज्य सरकारच्या मागण्याचे निवेदन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, ओबीसी मंत्री, मुख्य सचिव, ओबीसी खात्याचे सचिव, जिल्हाचे पालकमंत्री , जिल्ह्याच्या खासदार व सर्व आमदार यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
धरणे आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघ,प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्याम लेडे, ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे,महिला महासंघाच्या जिल्हाध्यक्ष भावना बावनकर, महासचिव मनिषा बोबडे, दुर्गाताई चवरे, ममता डुकरे,इमदाद शेख,श्रीहरी सातपुते,अक्षय येरगुडे ,रामदास कामडी,मनोहर शेंडे, प्रदीप पावडे, देवा पाचभाई, गणेश आवारी, विपिन देऊळकर, पूजा राऊत,आतकरी सर,प्रेमा जोगी,अक्षय लांजेवार,रामराव हरडे लोहकरे सर,प्रा पिसे सर, सतीश भीवगडे , पप्पू देशमुख,अ. भा. ओबीसी संघटनेचे अध्यक्ष मा. डी. के. चौधरी , कोषाध्यक्ष मा. पी. एन. बगमारे, सहसचिव मा.एस. एस. बावनकर,संघटक मा. डी. एस. समर्थ, संघटक मा. आर. एम. मोरांडे, संघटक मा. ए. जी. समर्थ, इ.पधादिकारी, विद्यार्थी धरणे आंदोलनात सहभागी झाले.