Online property tax payment Chandrapur । २५% सूट घेऊन कर भरा, नाहीतर जप्त होईल मालमत्ता

Online property tax payment Chandrapur

15 फेब्रुवारी पर्यंत थकबाकीसह मालमत्ता कराचा एकरकमी भरणा करणाऱ्याना ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास 50 टक्के तसेच ऑफलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास 45 टक्के शास्तीत सवलत मनपातर्फे देण्यात आली होती .मात्र सवलत देऊनही कर भरणा करणाऱ्यांचे प्रमाण फार  कमी असल्याने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.  

आमदार सुधाकर अडबाले यांचा आक्रमकपणा, निप्पोन चे काम पाडले बंद

 
    15 फेब्रुवारी पर्यंत केवळ 8734 मालमत्ता धारकांनी शास्तीत सवलतीचा लाभ घेतला आहे. 15 फेब्रुवारी नंतर सुद्धा ऑनलाईन 25 टक्के व ऑफलाईन 22 टक्के शास्तीत सूट मनपातर्फे देण्यात येत आहे. सवलत देऊनही मालमत्ता कर न भरण्याकडेच नागरिकांचा कल दिसत असल्याने सक्त पाऊले मनपाला उचलावी लागत आहे. (Chandrapur Municipal Corporation tax discount)

करवसुली करिता महानगरपालिकेतर्फे १५ पथके नेमण्यात आली असुन प्रत्येक पथकाला दर दिवशी किमान १० मालमत्ता धारकांवर कारवाई करण्याचे तसेच जप्तीसोबतच मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आले आहेत.  

chandrapur property tax 25% discount


    ऑनलाईन 25 टक्के व ऑफलाईन 22 टक्के शास्तीत सूट ही 31 मार्चपर्यंत लागू राहणार असुन कर भरणा करणे सुविधेचे व्हावे या दृष्टीने 31 मार्च पर्यंत येणाऱ्या प्रत्येक सुटीच्या दिवशी मालमत्ता कर भरणा कार्यालय सुरु राहणार आहे. ज्या मालकांना त्यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने आर्थिक उत्पन्न प्राप्त होत असतानाही मालमत्ता कर थकविणार्‍या थकबाकीदारांनी लवकरात लवकर आपल्या थकीत कराचा भरणा करून महानगरपालिकेकडून करण्यात येणारी जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  Chandrapur property tax 25% discount

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!