Plastic seizure in Chandrapur | चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्लास्टिकबंदी अभियानात मोठी कारवाई

Plastic seizure in Chandrapur

Plastic seizure in Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई सुरू असुन उपद्रव शोध पथकाद्वारे दादमहाल वॉर्ड येथील वाशिम खान यांच्या घरून 250 किलो प्लास्टिक पन्नी जप्त करण्यात आले आहेत तसेच संबंधितांवर 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

वैनगंगा नदीत बुडून चंद्रपुरातील 3 सख्ख्या बहिणीचा करून अंत


    बंदी असलेल्या व एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार 8 टीम्स बनविण्यात आल्या आहेत. या सर्व चमूंद्वारे शहरात नियमित कारवाई करण्यात येते. यावेळेस सुद्धा या दुकानासंबंधी गुप्त माहिती मनपास प्राप्त झाली होती. (Chandrapur Municipal Corporation plastic ban)

प्लास्टीक साठा,पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येत असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास 5 हजारांचे बक्षिस दिल्या जात असल्याने अनेक सुजाण व्यक्तींकडुन अवैध साठ्यासंबंधी तक्रारी मनपास प्राप्त होत आहेत. (Illegal plastic storage in Chandrapur)


     एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर 5 हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास 10 हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर 25 हजार रुपये दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.


     सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,स्वच्छता निरीक्षक शुभम खोटे,शुभम चिंचेकर, राहुल गगपल्लिवर, प्रफुल पोतराजे,रुचिर कोरेकर यांनी केली. 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!