Rajoli Chak revenue village update । वाघांचा धोका आणि अंतराचा अडथळा – प्रशासनाचा ग्रामस्थांसाठी मोठा निर्णय!

Rajoli Chak revenue village update

Rajoli Chak revenue village update : सावली तालुक्यातील मौजा राजोली चक हे महसूली गाव, चकविरखल या तलाठी साझ्यातून कमी करून बोथली तलाठी साझ्यामध्ये समाविष्ट करण्याबाबतची अंतिम अधिसुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी प्रसिध्द केली आहे.

चंद्रपूर आरटीओचा वसुली भाई

महाराष्ट्र शासन राजपत्रान्वये, तलाठी साझा पुर्नरचना करून चंद्रपूर जिल्ह्यात या पूर्वी असलेल्या 299 तलाठी साझ्यांमध्ये नव्याने 133 तलाठी साझे निर्माण करण्यात आले आहेत. सावली तालुक्यातील चिचबोडी येथील सरपंचांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. यात मौजा राजोली चक हे गाव नव्याने अंतर्भूत झालेल्या चकविरखल या साझ्याच्या मुख्यालयापासून 15 कि.मी. दूर आहे. त्यामुळे ग्रामस्थांना शासकीय कामाकरीता ये-जा करण्याकरीता दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत. तसेच रस्त्यात घनदाट जंगल असून वाघांची भीती असल्यामुळे मौजा राजोली चक हे महसूली गाव चकविरखल या साझाऐवजी बोथली या साझ्यामध्ये अंर्तभूत करण्याची मागणी केली होती. Revenue village transfer notification Maharashtra

या निवेदनाच्या अनुषंगाने सावलीच्या तहसीलदारांनी मौका चौकशी करून अहवाल सादर केला. मौजा राजोली चक हे महसूली गाव चकविरखल या साझ्याच्या मुख्यालयापासून 15 कि.मी दूर असल्याने ग्रामस्थांना शासकीय कामाकरीता ये-जा करण्याकरीता दळणवळणाच्या दृष्टीने 2 कि. मी दूर असलेला बोथली हा साझा सोयीचे असल्याचे कळविले होते. त्या अनुषंगाने अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या तलाठी साझांची पुनर्रचना करण्याबाबत शिफारसी मधील मुद्दा क्र. 6.1.3 मध्ये “प्रत्येक तलाठी साझाचे मुख्यालयापासून त्या साझ्यास संलग्न करण्यात येणारे गाव 10 कि.मी पेक्षा जास्त अंतरावर शक्यतो नसावे. उपलब्ध दळण-वळण व्यवस्थेचा विचार करून त्याबाबतचा निर्णय संबंधित जिल्हाधिकारी यांनी घ्यावा” असे नमूद आहे. Chandrapur district government gazette

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 4 पोटकलम (2) नुसार तलाठी साझा निर्मिती किंवा फेरबदल करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. तसेच, अधिनियमाच्या कलम 4 पोटकलम (4) च्या अन्वये अंतिम अधिसुचना प्रसिध्द करण्यापूर्वी प्रारूप अधिसुचना 2 जानेवारी 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. प्रारूप अधिसुचनेच्या प्रसिध्दीनंतर कोणताही आक्षेप किंवा उजर या कार्यालयास विहीत वेळेत प्राप्त झाला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी तलाठी साझा पुनर्रचनेबाबत 10 नोव्हेंबर 2017 रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रात बदल करून अनुसूचीप्रमाणे मौजा राजोली चक हे महसुली गाव चकविरखल या साझामधून कमी करून बोथली या साझाला पुर्ववत जोडण्यात आले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!