Special adoption agency Gadchiroli | गडचिरोली विशेष दत्तक संस्थेतून पहिले बालक दत्तक – विहानला मिळाले नवे पालक

Special adoption agency Gadchiroli

Special adoption agency Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यात मागील एक वर्षापासून कार्यरत असलेली लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित विशेष दत्तक संस्था बजरंग नगर, हनुमान मंदिराच्या मागे, गडचिरोली येथे कार्यरत आहे. ही संस्था अनाथ, निराश्रित, सापडलेली, अनैतिक संबंधातून जन्मलेली बेवारस बालके तसेच शरण आलेल्या किंवा आत्मसमर्पण केलेल्या कुटुंबातील बालकांच्या शैक्षणिक, शारीरिक, व आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करते. मानसिक व शारीरिक विकलांग बालकांची काळजी घेणे, संरक्षण करणे आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. (Maharashtra child adoption center)

आमदाराच्या हस्तक्षेपानंतर त्या कामगार कुटुंबाला मिळाली मोठी मदत


महिला व बाल विकास विभाग अंतर्गत, महाराष्ट्र शासन मान्यता असलेली गडचिरोली जिल्ह्यातिल ही एकमेव संस्था आहे आणि या संस्थेला सप्टेंबर महिन्या मध्ये नोंदणी प्रमाण पत्र प्राप्त झाले होते आणि काहीच दिवसात सापडलेले बाळ हे या संस्थेतील पहिल्या बाळाच्या रूपाने या संस्थेच्या कार्याला सुरवात झाली.

विशेष दत्तक संस्थेतील पहिले बालक हे खरपुंडी गावाजवळ रस्त्याच्या कडेला अतिशय दयनीय अवस्थेत सापडलेले होते त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे दाखल केले गेले. त्यानंतर बाल कल्याण समिति गडचिरोली यांच्या आदेशाने त्याची काळजि व संरक्षण करण्याची जबाबदारी या संस्थेने अतिशय चांगल्या पद्धतीने केली आणि आज त्या बालकाला पालकत्व प्राप्त झाले. (How to adopt a child in Maharashtra)


विशेष दत्तक संस्थेतील पहिले दत्तक मुक्त बालक, विहान, यास कारा नियमावलीच्या दत्तक विधान प्रक्रियेचे पालन करून दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी दत्तकपूर्व परिपोषणासाठी इंदोर येथील पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

Maharashtra child adoption center


याप्रसंगी मा. श्री प्रकाश भांदककर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या हस्ते दत्तक पालकांना बालकाचे हस्तांतरण करण्यात आले. या कार्यक्रमास मा. श्री अविनाश गुरनुले जिल्हा बाल संरक्षण अधिकारी; विशेष दत्तक संस्थेचे संस्थापक श्री. पुरुषोत्तम चौधरी; कार्याध्यक्ष श्री. महेश हजारे; अधिक्षक श्री. नशिब जांभुळकर; अधिपरिचारिका कु. डिम्पल सहारे, तसेच संस्थेच्या सर्व आया व कर्मचारी उपस्थित होते.


या कार्यासाठी बाल कल्याण समिति, जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली आणि विशेष दत्तक संस्थेच्या सर्व कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!