Tadoba Zero Waste Initiative । “ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील गावांचा स्वच्छतेकडे प्रवास”

Tadoba Zero Waste Initiative

Tadoba Zero Waste Initiative : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील सर्व गावांमध्ये कचरा वर्गीकरण, कचरा विलगीकरण तसेच जबाबदारीने कचरा निर्मूलन इत्यादी मार्गाचा अवलंब करून गाव पातळीवरील घनकच-याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने ‘झिरो वेस्ट ताडोबा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहिमेसाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. हे थेट भद्रावती तालुक्यातील आष्टा गावात सकाळीच दाखल झाले. यावेळी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी उपस्थित होते.

स्वच्छता मोहिमेदरम्यान जिल्हाधिका-यांनी गावातील नागरिक व शाळकरी मुलांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले. तसेच शेतक-यांना ॲग्रीस्टॅक योजनेची माहिती दिली. सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी तयार करून घ्यावे. संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी, सीएससी सेंटर, महाऑनलाईन (सेतू) केंद्र या माध्यमातून मोफत फार्मर आयडी तयार करून मिळेल, असे सांगितले. यावेळी जिल्हाधिका-यांनी गाव तिथे स्मशानभूमी, अंगणवाडी व गावातील इतर सर्व समस्या जाणून घेतल्या. (Tadoba Buffer Zone Waste Management)

चंद्रपूर शहरासाठी स्वतंत्र जलस्रोत निर्माण करा – खासदार प्रतिभा धानोरकर

दर मंगळवारी कोअर विभागातील पर्यटन बंद असल्याने सर्व जिप्सी वाहन चालक, मार्गदर्शक इत्यादी लोकांना समाविष्ट करून तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून हे अभियान राबविण्यात येते. प्रत्येक आठवड्याला वनविभागाद्वारे एका नवीन गावी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. आष्टा हे गाव या उपक्रमात सहभागी होणारे 13 वे गाव ठरले. ताडोबा प्रशासनाव्दारे ही स्वच्छता मोहीम आखण्यात आली होती. तहसीलदार, गटविकास अधिकारी, वन कर्मचारी तसेच गावकरी अशा जवळपास 100 लोकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विलगीकरण केलेला 96.6 किलो प्लास्टिकचा कचरा गोळा करून प्रक्रियेकरिता देवाडा येथील विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आला. (Tadoba Tiger Reserve Cleanliness Drive)

दर मंगळवारी राबवण्यात येणा-या या उपक्रमाद्वारे आजपर्यंत तब्बल 75 हजार किलो पेक्षा जास्त वाळला कचरा प्रक्रियेसाठी पाठवण्यात आलेला आहे. तर एकट्या मोहर्ली गावात ओल्या कचऱ्यापासून 30 हजार किलो पेक्षा जास्त कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून अनेक गावकरी, महिला बचत गट, विविध समाजसेवी संस्था तसेच इतर समाज घटक स्वयंस्फूर्तीने वनविभागाने सुरू केलेल्या या उपक्रमात सहभागी होत आहेत, अशी माहिती उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी यांनी दिली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!