Three Youths Drowned in Wardha River
Three Youths Drowned in Wardha River : चुनाळा : महाशिवरात्रीनिमित्त चुनाळा येथील काही नागरिक वर्धा नदीच्या घाटावर आंघोळीसाठी गेले असता, त्यांच्यासोबत घराजवळील तुषार आत्राम, मंगेश चणकापुरे आणि अनिकेत कोडापे हे तिन्ही युवकही आंघोळीसाठी नदी पात्रात उतरले. महिला एका बाजूला आंघोळ करत असताना, तिन्ही युवक काही अंतरावर जाऊन पाण्यात उतरले. मात्र, त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. Wardha River Accident
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथे वैनगंगा नदी पात्रात ३ सख्य्या बहिणी बुडाल्या
यावेळी त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच जवळ उपस्थित असलेले रामचंद्र रागी यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर यांनी तत्काळ राजुरा पोलिसांना कळवले. घटनास्थळी राजुरा पोलिस दाखल झाले. मात्र, सदर क्षेत्र बल्लारपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने बल्लारपूर पोलिससुद्धा घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा शोध घेऊ लागले. Wardha River Drowning News
बचावकार्य सुरू, मृतदेहांचा शोध अद्याप सुरू
राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग, चंद्रपूर येथे संपर्क साधून बोटीची व्यवस्था केली. सध्या बोटीद्वारे मृतदेहांचा शोध सुरू आहे. वृत्त लिहीपर्यंत एक मृतदेह सापडला होता तर २ मृतदेहाचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे. Chandrapur Drowning Case
पुन्हा दुर्घटना!
गेल्या वर्षी याच ठिकाणी चुनाळा येथील मासिरकर यांचा मुलगा बुडाल्याची घटना घडली होती. या भागात वारंवार अपघात घडत असल्याने स्थानिक प्रशासनाने विशेष सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.
घटनास्थळी अधिकारी आणि ग्रामस्थांची उपस्थिती
घटनास्थळी राजुराचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार, बल्लारपूर पोलिस स्टेशनची टीम, राजुराचे नायब तहसीलदार किशोर तेलंग, आपत्ती व्यवस्थापन चंद्रपूरची टीम, चुनाळा ग्राम पंचायत सरपंच बाळनाथ वडस्कर, पोलिस पाटील निमकर तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही दुर्दैवी घटना संपूर्ण परिसराला हादरवून टाकणारी असून, भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.