Underground drainage system
Underground drainage system : पंधरा वर्षांपूर्वी संपूर्ण चंद्रपूर शहरात टाकलेल्या जुन्या भूमिगत गटार योजनेचा आज जनविकास सेनेतर्फे प्रतीकात्मक दफनविधी करण्यात आला. जटपुरा गेट जवळील जनार्दन मेडिकल समोर मनपाने खोदलेल्या खड्ड्यात आज दुपारी 2 वाजे दरम्यान हा दफन विधी चा कार्यक्रम करण्यात आला. यानंतर 2 मिनिटे मौन पाळून जुन्या भूमिगत गटार योजनेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
राजकीय नेत्यांच्या वेशभुषेतील ‘आकाचे आका’ कोण ?
चंद्रपूर महानगरपालिकेला लुटणारे आयुक्त ‘आका’ असल्याचा तसेच त्यांना संरक्षण देणारे ‘आकाचे आका’ असल्याचा आरोप जनविकास सेनेने एका पत्रकार परिषदेतून केला होता.भूमिगत गटार योजनेच्या प्रतीकात्मक अंत्यविधीला ‘आका, मनपा आयुक्त’, आकाचा आका चंद्रपूर, आकाचा आका जिल्हाधिकारी कार्यालय, आकाचा आका मंत्रालय’ असे फलक छातीवर लावलेले जनविकास सेनेचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. Urban drainage project
उन्हाळा आलाय, कुलर लावंताय तर ही बातमी वाचा
सुटा बुटात असलेले प्रतीकात्मक जिल्हाधिकारी व त्यांच्या शेजारी मंत्रालयातील सचिव हे आकाचे प्रशासकीय आका असल्याची भूमिका जनविकास सेनेने अप्रत्यक्षपणे स्पष्ट केली. परंतु राजकीय नेत्यांच्या वेशभूषेतील दोघांच्या छातीवर ‘आकाचे आका चंद्रपूर‘ असे फलक लावले होते. जनविकासनेकडून मनपा आयुक्तांच्या भ्रष्टाचाराला लोकप्रतिनिधी संरक्षण देत असल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु अंत्यविधीला प्रतीकात्मक उपस्थिती असलेले हे दोन लोकप्रतिनिधी कोण आहेत ? हे मात्र अजून स्पष्ट झाले नाही.
जुन्या भुमिगत गटार योजनेच्या आठवणींना उजाळा
प्रतिकात्मक अंत्यविधीच्या वेळी माजी नगरसेवक व जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. योजनेच्या अनेक चांगल्या वाईट आठवणी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तेव्हाचे नगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकारी यांना मोठा लाभ या योजनेतून झाला.त्यांची कुटुंब सक्षम झाली. त्यांच्या कुटुंबाला आधार मिळाला. अंदाजे 100 कोटी रुपये खर्च करून तयार झालेल्या या योजनेसाठी ५ ते ६ वर्षे संपूर्ण शहर खोदण्यात आले होते. Municipal corruption scandal
लहान मुले,प्रौढ व जेष्ठ नागरिक या सर्वांनाच ५ ते ६ वर्षे मोठा त्रास सहन करावा लागला. श्वसनाचे आजार, मान व मणक्याचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले. अनेक नागरिकांना कायमचे आजार जडले. चंद्रपूर शहरातील लाखो लोकांनी मोठा त्याग केल्यानंतर या योजनेचे 90 टक्के काम पूर्ण झाले. Symbolic protest in politics
घर जोडणी केल्यानंतर योजनेतून दरवर्षी २ कोटी रुपये महसूल प्राप्त होईल असे मागील 10 वर्षाच्या मनपाच्या अंदाजपत्रकामध्ये नमूद करण्यात येत आहे.
मात्र आता नवीन ५०६ कोटी भूमिगत गटार योजनेचे काम सुरू झाल्याने जनविकास सेनेने जुन्या गटार योजनेचा प्रतिकात्मक अंत्यविधी केला.