Union Budget 2025 India | आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्‍पाचे केले स्‍वागत

Union Budget 2025 India

Union Budget 2025 India : पंतप्रधान विश्‍वगौरव नरेंद्रभाई मोदी यांच्‍या सबका साथ – सबका विकास – सबका विश्‍वास या धोरणानुसार भारताच्‍या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्‍प हा शेतकरी, महिला, युवक, नोकरदार आदी सर्वच घटकांना न्‍याय देणारा भारताच्‍या सर्वसमावेशक विकासाचा संकल्‍प मांडणारा अर्थसंकल्‍प असल्‍याची प्रतिक्रिया आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे. देशाला विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर करणारा अर्थसंकल्‍प सादर केल्‍याबद्दल आमदार मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे अभिनंदन केले आहे.

तलाठी हल्ला प्रकरण, 2 आरोपीना अटक

 या अर्थसंकल्‍पात शेतकरी वर्गाला अर्थमंत्र्यांनी केंद्रास्‍थानी ठेवले आहे. विशेषतः कापूस उत्‍पादकांसाठी ५ वर्षांचे पॅकेज, कापुस उत्‍पादक मिशन, स्‍वस्‍त व्‍याजदरावर शेतक-यांना ५ लाखापर्यंतचे कर्ज हे संकल्‍प देशातील शेतक-यांना दिलासा देणारे आहे. कापुस उत्‍पादक शेतक-यांना केंद्र सरकारने दिलेली ही विशेष भेट आहे. त्‍याचप्रमाणे आर्थिक घडामोडींमध्‍ये ७० टक्‍के महिलांचा असलेला सहभाग तसेच अनुसुचित जाती व जमातींच्‍या महिलांना उद्यमी म्‍हणून प्रोत्‍साहन देण्‍याचा संकल्‍प महिला विकासाला चालना देणारा आहे. (Nirmala Sitharaman Budget 2025)

एमएसएमईसाठी नॅशनल मॅन्‍युफॅक्‍चरींग मिशनची घोषणा या क्षेत्राला प्रोत्‍साहन देणारी आहे. तसेच एमएसएमईसाठी मोठी तरतूद करण्‍यात आली आहे. मत्‍स्‍य उत्‍पादनाला मोठे प्रोत्‍साहन देखील देण्‍यात आले आहे. कमी उत्‍पन्‍न असलेल्‍या जिल्‍हयांसाठी धनधान्‍य योजना शेतकरी व गरीब नागरिकांना दिलासा देणारी आहे. युवकांसाठी कौशल्‍य प्रशिक्षणाच्‍या योजना व त्‍यासाठी करण्‍यात आलेली तरतूद युवक कल्‍याणाबद्दल सजगता दर्शविणारी आहे. (Farmer benefits in Budget 2025)

पर्यटन विकासाला चालना देण्‍यासाठी ५० पर्यटन स्‍थळे विकसित करण्‍याचा संकल्‍प तसेच मेडीकल टूरिझम ही संकल्‍पना राबविण्‍याचा संकल्‍प पर्यटन विकासाला चालना देणारा आहे. पायाभूत सुविधांच्‍या विकासावर भर देत करण्‍यात आलेली तरतूद विशेष महत्‍वपूर्ण असून येत्‍या १० वर्षात १२० विमानतळ विकसित करण्‍याचा तसेच नविन काही ग्रीनफिल्‍ड विमानतळ विकास विकसित करण्‍याचा संकल्‍प देखील महत्‍वाचा आहे.

 आर्थीक सुधारणा करताना करदात्‍यांना मोठा दिलासा अर्थमंत्र्यांनी दिला आहे. देशातील मध्‍यमवर्गीयांना या माध्‍यमातुन मोठा दिलासा दिला आहे. १२ लाख रू. पर्यंत उत्‍पन्‍न असलेल्‍यांवर कोणताही कर न आकारण्‍याचा निर्णय अतिशय महत्‍वाचा असून कॅन्‍सर व इतर गंभीर आजारांसाठीची औषधे करमुक्‍त करण्‍याचा निर्णय देखील दिलासा दायक आहे.

याशिवाय सुक्ष्‍म उद्योगांसाठी कस्‍टमाईज क्रेडीट कार्ड, छोटया गुंतवणुकदारांना प्रोत्‍साहन ही देखील महत्‍वाची पाऊले सरकारने उचलली आहे. सर्वच क्षेत्रातील सर्वच घटकांना न्‍याय देत महागाई नियंत्रणात आणण्‍यासाठी केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्‍प देशाला प्रगतीपथावर नेणारा असल्‍याची प्रतिक्रिया आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!