Ashish Shelar । महाकाली यात्रेसाठी विशेष सुविधा! चंद्रपूरमध्ये सांस्कृतिक मंत्र्यांसमोर महत्त्वपूर्ण मागण्या

Ashish Shelar Minister for Information Technology of Maharashtra

Ashish Shelar : महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या चंद्रपूर दौर्‍यानिमित्त भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभेच्या वतीने शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे श्री माता महाकालीची मूर्ती, अम्मा का टिफिन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक आणि विकासविषयक मागण्यांवर चर्चा करण्यात आली. झाडीपट्टी रंगभूमीसाठी ५ कोटी निधी तसेच महाकाली यात्रेसाठी दरवर्षी २ कोटी रुपयांच्या निधीची तरदूत करण्याची मागणी करण्यात आली. Mahakali Yatra Chandrapur fund

याप्रसंगी अजय जैस्वाल, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष दशरथ सिंग ठाकूर, माजी महानगर जिल्हाध्यक्ष तुषार सोम, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, प्रदीप किरमे, श्याम कनकम, पुरुषोत्तम राऊत, विठ्ठल डुकरे, पूनम तिवारी, शेखर शेट्टी, अमोल शेंडे, विश्वजित शहा, जितेश कुळमेथे, प्रतीक शिवणकर, करण बैस, सुमित बेले, हरमन जोसेफ, विनोद शेरकी, शशिकांत म्हस्के, विकास खटी, संजय निकोडे, अभिजित पोटे, राजू व्यंकटवार, कार्तिक बोरेवार, महेश गहुकर, संजय महाकालीवार, सुरेंद्र अंचल, रुपेश पांडे, ताहीर हुसेन, राकेश पिंपळकर, करण नायर, गुड्डू सिंग, मंगेश अहिरकर, अक्षय घोटेकर, नीलिमा वनकर, विमल काटकर, शालू कनोजवार आदी उपस्थित होते.

झाडाखाली निवांत झोपला, मात्र दुसऱ्या दिवशी घडलं असा भयावह

भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभेच्या वतीने झाडीपट्टी रंगभूमीच्या संवर्धनासाठी चंद्रपूर येथे रंगमंचाच्या बांधकामासाठी ५ कोटी निधी मंजूर करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. झाडीपट्टी रंगभूमी ही विदर्भातील लोककलेचा अनमोल ठेवा असून, या पारंपरिक नाट्यप्रकाराच्या जतन व प्रसारासाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. Chandrapur tourism festival funds

ashish shelar in chandrapur

तसेच, चंद्रपूरमधील श्री महाकाली माता यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षेसाठी दरवर्षी २ कोटी निधीची तरतूद करण्याची विनंती करण्यात आली. यात्रेदरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने स्वच्छता, वाहतूक नियोजन तसेच सुरक्षाव्यवस्थेवर विशेष भर देण्याची गरज असल्यामुळे दरवर्षी हा निधी मंजूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!