Ballarpur police action । बिहारची बंदूक, चंद्रपूरचे गुन्हेगार

Ballarpur police action

Ballarpur police action : चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे अनियंत्रित झाली आहे, हत्या, एमडी ड्रग्स असे अनेक गुन्हे दररोज जिल्ह्यात बघायला मिळत आहे. 25 मार्च रोजी बल्लारपूर पोलिसांनी 3 युवकांना बंदुकीसह अटक केली.

चंद्रपुरातील संडे मार्केट बंद

पेट्रोलिंग करीत असताना बल्लारपूर पोलिसांना साईबाबा वार्ड येथे तीन आरोपिकडून बंदुकीसह जिवंत काडतुस जप्त करण्यात आले, तिघे आरोपी हे चंद्रपुरातील असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. Chandrapur gun seizure

illegal arms chandrapur

आरोपी 24 वर्षीय अभि वाल्मिक, 24 वर्षीय विनोद नानाजी तावाडे व 24 वर्षीय संकेत रवींद्र येसेकर अटकेतील आरोपीचे नाव आहे.
बंदूक व जिवंत काडतुस सोबत घेऊन ते आलापल्ली जिल्हा गडचिरोली च्या दिशेने निघाले होते मात्र वाटेतच त्यांना पोलिसांनी अटक केली. सदर बंदूक बिहार वरून आणल्याची माहिती आहे. Illegal arms Chandrapur


बल्लारपूर पोलिसांनी लोखंडी गावठी बनावटीचा देशी कट्टा, 1 जिवंत बुलेट असा एकूण 22 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीवर भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम गव्हाने यांच्या नेतृत्वात सपोनि मदन दिवटे, पोउपनी सौरभ साळुंखे, सुनील धांडे, पोलीस कर्मचारी आनंद परचाके, सुनील कामटकर, पुरुषोत्तम चिकाटे, संतोष दंडेवार, संतोष पंडित, सत्यवार कोटनाके, वशिष्ट रंगारी, लखन चव्हाण, शरदचंद्र कारुष, शेखर माथनकर, भास्कर चीचवलकर, कैलास चीचवलकर, अनिता नायडू यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!